ना.मुनगंटीवार यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न दुर्देवी .. काँग्रेसचे कार्यकर्ते विजय चिमड्यालवार व राकेश रत्नावार यांना दिला लाडक्या बहिणींनी चोप .!
बल्लारपूर (का.प्र.) : गेल्या पंधरा वर्षांपासून जो नेता बल्लारपूरचे यशस्वी नेतृत्व करतोय. ज्याच्या प्रयत्नांमुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. सुसंस्कृत, सभ्य आणि एक अभ्यासू नेता म्हणून ज्या नेत्याची महाराष्ट्रात ओळख आहे… अशा सुधीर मुनगंटीवार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत दुर्देवी आणि काँग्रेसच्या वैचारिक दारिद्र्याचे लक्षण आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. बल्लारपूरचे काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांच्यासमक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांना केलेल्या धक्काबुक्कीच्या प्रयत्नांचा संपूर्ण मतदारसंघातून निषेध व्यक्त होत आहे. संतोष रावत व त्यांच्या कार्यकर्त्यांची ही वागणूक म्हणजे 'विनाशकाले विपरित बुद्धी' आहे. निवडून येण्यापूर्वीच अशा गुंड प्रवृत्तीचे प्रदर्शन काँग्रेसकडून होत असेल तर निवडून आल्यावर किती उपद्रव माजवला जाईल, याची कल्पना करून मतदारांनी त्यांना धडा शिकवावा, अशी प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे.
मुल तालुक्यातील कोसंबी येथे गावातील लोकांची नलेश्वर तलावाच्या विषयावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नागरिकांशी चर्चा करत होते. त्याचवेळी तेथे काँग्रेसचे संतोष रावत कार्यकर्त्यांसोबत पोहोचले. आणि उपस्थितांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अश्याही परिस्थितित शत्रूचेही आनंदाने स्वागत करण्याचे संस्कार ज्यांच्यावर आहेत असे ना.सुधीर मुनगंटीवार यांनी संतोष रावत सोबत अत्यंत नम्रपणे संवाद साधला. ‘मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे चर्चा करतोय. माझी चर्चा झाल्यानंतर तुम्हालाही चर्चा करण्याचा अधिकार आहे,’ असं त्यांनी अतिशय नम्रपणे रावत यांना सांगितलं.
रावत यांच्याप्रमाणेच त्यांचे काँग्रेसचे कार्यकर्तेही गुंड प्रवृत्तीचे त्यामुळे त्यांनी मुनगंटीवार यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. किमान ते महाराष्ट्राचे जेष्ठ नेते,मंत्री आहेत, याचेही भान त्यांना राहीले नाही. मात्र सुरक्षारक्षकांनी रावत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा डाव हाणून पाडला.
संतोष रावत यांची वृत्ती गुंडप्रवृत्तीची आहे, अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्या आहेत. ना.मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्याच्या बाबतीत आजवरच्या इतिहासात असे कधीही घडले नाही. पण रावतसारखा उपद्रवी, गुंडप्रवृत्तीचा उमेदवार काँग्रेसकडून उभा असल्याने हा प्रकार घडला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे.
बहिणींनीच दिला चोप :
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी उपस्थितांसोबत हुज्जत घातली. महिलांना अपशब्द वापरल्यावर लाडक्या बहिणींनीच चोप दिला.काँग्रेसचे विजय चिमड्यालवार व राकेश रत्नावार यांना ग्रामस्थ महिलांनी चांगले बदडून काढले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांचा चष्माही या झटापटीत फुटल्याची माहिती आहे.
लाडक्या बहिणी झाल्या लाडक्या भावाची ढाल — महिला आक्रमक झाल्यांने, कॉंग्रेसचा डाव उलटला
बल्लारपुर : बल्हारपूर विधानसभा मतदार संघातील कोसंबी गावात काल रात्रौ कॉंग्रेस—भाजपात राडा झाला. रावत रिंगणात असल्यांने असे काहीतरी—कधीतरी होणारच याची कुणकुण मतदाराना होतीच! कालच्या घटनेने मतदारातील भिती खरी ठरली. गावात सुरू असलेल्या चर्चेनुसार कोसंबी गावात कॉंग्रेसची सत्ता आहे. सरपंच कॉंग्रेसचा आहे. गावकर्यांना एका तलावाचे कामासाठी मुनगंटीवारची मदत हवी होती. सरपंच विरोधी पक्षाचे बाजुने असल्यांने, तलावाची दुरूस्ती होत नव्हती. भाजपाचे कार्यकर्ते गावकर्यांची मागणी मुनगंटीवार यांचे पर्यंत पोहचवित नव्हते. लोकसभेच्या निवडणूकीतील भाजपा कार्यकर्त्याच्या अनुभवानंतर सुधीर मुनगंटीवार हे आता थेट मतदारांशी कनेक्ट होत असल्यांने, गावकर्यांनी त्यांची अडचण मुनगंटीवारांना सांगीतली. प्रचारादरम्यान सुधीर मुनगंटीवार यांना कोसंबी येथे जाता आले नाही. त्यांनी प्रचार संपल्याचे दिवशी रात्रौ कोसंबी येथे भेट दिली. गावात मुनगंटीवार यांची बैठक सुरू असतानाच, मूलवरून कॉंग्रेसचे उमेदवार संतोष रावत व त्यांचे समर्थक बैठक स्थळी गेलेत. प्रचाराची वेळ संपल्यानंतरही, प्रचार कसा करीत आहात असा प्रश्न त्यांनी मुनगंटीवार यांना विचारला. आचार संहितेचा भंग करीत असल्याचा आरोपही केला. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी, आपण आचार संहितेचा भंग करीत असल्यास, आपण माझी निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकता, पोलिसात तक्रार करू शकता. मी येथून गेल्यानंतर, तुम्हालाही येथे बैठक घेता येईल, माझी काही हरकत राहणार नाही मात्र तुम्हाला येथे मला येवून जाब विचारण्याचा अधिकार नाही असे म्हणत असतांनाच, संतोष रावत यांचेसोबत आलेल्यापैकी काहीनी सुधीर मुनगंटीवार यांचे दिशेने हल्ला करण्यांचे हेतूने आक्रमक होताना मुनगंटीवार यांचे अंगरक्षक आणि सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच, मुनगंटीवार यांना धक्काबुक्की करणार्यांस आडवे झाले. यामुळे तेथे मोठा गदारोळ झाला. काही कॉंग्रेस कार्यकर्ते स्थानिक महिलांच्या अंगावर गेल्यांने, त्यांनी या कार्यकर्त्यांचा चांगलाच चोप दिला.
कॉंग्रेस उमेदवार संतोष रावत व त्यांचे समर्थकांनी जे काम निवडणूक आयोगानी करावयाला पाहीजे, ते काम करण्यासाठी स्वत:च कायदा हातात घेतल्यांने, सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षक जोपर्यंत घटनास्थळी येवून वस्तुस्थिती जाणून घेत नाही, तोपर्यंत आपण हलणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर पोलिस अधिक्षक कोसंबी येथे घटनास्थळी आले, तेथे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे बयाण नोंदवून घेतल्यानंतरच मुनगंटीवार हे सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात चंद्रपूरला रवाणा झालेत.
या राड्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यांने, भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचेसह भाजपा कार्यकर्त्यावर कारवाई करावी, आचार संहितेचा भंग केल्यांने, सुधीर मुनगंटीवार यांचेवर कारवाई करावी या मागणीसाठी कॉंग्रेस कार्यकर्ते यांनी मूल पोलिस स्टेशनला ठिया मांडला. पहाटे चार वाजताचे दरम्यान पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांचे मध्यस्थीनंतर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर, कॉंग्रेस कार्यकर्ते पोलिस स्टेशनमधून बाहेर पडले.
निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन हा गुन्हा आहेच. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तो गुन्हा केला असेल तर, त्यांचेवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी आहे. आयोगाने अशा तक्रारी करीता एका अॅपची निर्मीतीही केली आहे. मुनगंटीवार यांनी आचार संहिता भंग केली होती तर, कॉंग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी हाकेवरच्या अंतरावर असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी किंवा पोलिसांत तक्रार का नोंदविली नाही? असा प्रश्न आता विचारला जात आहे. आयोगाने अॅपची सोय केली असल्यांने, स्थानिक कोसंबीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातूनही अशी तक्रार करता आली असती. मात्र स्वत:च कायदा हातात घेवून 5 कि.मी. अंतरावर जावून उमेदवारांशी भिडून कॉंग्रेस उमेदवार संतोष रावत कोणता संदेश देत आहेत? आधी पोलिसावर विश्वास नसल्यांने आचार संहिता भंगाची तक्रार न नोंदविणारे संतोष रावत राड्यानंतर, पोलिसांकडेच न्याय मागण्यासाठी कसे गेले? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
कोसंबीच्या सुधीर मुनगंटीवार यांचे बैठकीत महिला मोठ्या प्रमाणावर होत्या. यामुळेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ‘फार काही’ करता आले नाही. कारण या महिलाच आक्रमक झाल्यांचे प्रत्यक्षदर्शीनी सांगीतले. ‘कोसंबीच्या लाडक्या बहिणीच सुधीर मुनगंटीवार यांचेसाठी सुरक्षेची ढाल झाल्याची’ चर्चा आता परिसरात आहे.