कोसंबी (वि.प्र.) : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल तालुक्यातील कोसंबी या गावी सोमवार दिनांक 18 रोजी रात्रो घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय असून या प्रकारची सर्वस्व सर्वत्र निंदानालस्ती होत आहे. निवडणूक म्हटली की हार पराभव आलाच परंतु पराभव पचवणे हे सर्वांचे काम नाही.
सुसंस्कृत संयमी व अभ्यासू प्रतिनिधी असलेले सुधीर मुनगंटीवार हे कोसंबी येथे तलावाची पाहणी करायला गेले असता त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांनी आपले साथीदार राकेश रत्नावर, विजय चिंमड्यालवार यांचे सह जाऊन यांची मुनगंटीवार यांना धक्काबुक्की केली सदर प्रकाराने उपस्थित असलेल्या कोसंबीवासियांनी विजय चिमडालवार यांना चांगला धडा शिकवला परंतु या प्रकरणाने काँग्रेस उमेदवार पराभवाच्या भितीने भांबावले असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
विशेष बाब म्हणजे सुधीर मुनगंटीवार हे दोनदा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिले असून तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत सुधीर मुनगंटीवार यांची ही सातवी निवडणूक असून आत्ता पावतो असा प्रकार त्यांच्यासोबत घडलेला नाही. अत्यंत संयमी, सुसंस्कृत स्वभावाचे मुनगंटीवार यांच्यासोबत घडलेल्या या प्रकाराने काँग्रेसने स्वतःच्या असंस्कृत व असभ्यपनाचे केलेले निदर्शन हे मतदारांपासुन आता लपून राहिले नाही.