बल्लारपुर (का.प्र.) : जनता हायस्कूल (डेपो विभाग) बल्लारपूर शाळेत कार्यरत सहाय्यक शिक्षक श्री. राजू किसनराव वानखेडे यांना पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, वृंदावन धाम मथुरा (उ. प्र.) यांच्या राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी आणि सन्मान समारंभात, इंदौर येथे २२ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित केला आहे, पाठवलेल्या अर्जाच्या आधारे विद्यापीठाच्या प्रबंध कार्यकारिणीने विचार करून, शिक्षण, गुणवत्ता आणि अनुभव लक्षात घेऊन 'साहित्य सृजनाच्या क्षेत्रात' विशेष योगदानाबद्दल 'विद्या वाचस्पति सारस्वत सन्मान' (पीएच.डी.) देण्याचा निर्णय घेतला आहे.
श्री. राजू वानखेडे यांनी 'विद्या वाचस्पति सारस्वत सन्मान' म्हणजे पीएच.डी. प्राप्त करण्याचे श्रेय संस्थाचालक डॉ. अशोकराव जीवतोडे, मार्गदर्शक श्री. गणेश पेटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. राजू पाताळे, उपशिक्षणाधिकारी कु. निखिता ठाकरे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. बी. भगत, सहकारी शिक्षक, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांना दिले आहे.