बल्लारपूर (का.प्र.) : पेपर मिल, बल्लारपूर येथील बुद्ध पौर्णिमा महोत्सव समितीने ७ नोव्हेंबर रोजी एससी, एसटी आरक्षणाचे वर्गीकरण आणि क्रीमीलेयरवर खुली चर्चासत्राचे आयोजन संध्याकाळी ४ वाजता एकदंत लॉन येथे केले आहे. या चर्चासत्रासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही माहिती समितीने पत्र परिषदेमध्ये दिली.
सुप्रीम कोर्टाने एससी, एसटी आरक्षणाचे वर्गीकरण आणि आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या अटीवर निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे एससी, एसटी समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या निर्णयावर सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची भूमिका जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर मार्गदर्शन करणार आहेत.
पत्र परिषदेमध्ये बुद्ध पौर्णिमा उत्सव समितीचे अध्यक्ष रितेश बोरकर, विश्वास देशभ्रतार, सचिव आकाशकांत दुर्गे, आनंद वालके, मुकेश लोणे, अॅड. पवन मेश्राम, अतुल शेंडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे.