बल्लारपुर (का.प्र.) : सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रविवारी सायंकाळी चार वाजता भोईराज भवन भोईपुरा पणज येथे भोईराज स्व. किसनराव तायडे यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाण्याचे से.नि.एडिशनल कलेक्टर श्री.रमेशजी घेवंदे साहेब हे होते.तसेच प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार श्री.शुकदास महाराज, सुप्रसिद्ध वह्राळी, कवी श्री. विठ्ठलराव कुलट, से.नि.तहसिलदार, श्री. सुरेशजी थोरात, से.नि.मंडळ अधिकारी
श्री. निळकंठराव नेमाडे साहेब, से.नि.शिक्षणाधिकारी, श्री. दयारामजी बावणे, मातोश्री सरस्वतीबाई सावरकर शाळेचे अध्यक्ष श्री.गजाननराव सावरकर साहेब,डॉ.काशीनाथजी दाते साहेब,भोई समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.रामकृष्णजी साटोटे साहेब,बुलढाण्याचे श्री.मेढे साहेब,श्री.कुणाल साहेब,श्री.महादेवराव बावणे या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते भोईराज स्व. किसनराव तायडे यांच्या स्मृती निमित्त सन २००७ पासून भारतभर विनामूल्य वाटप करण्यात येणारे भोईराज कॅलेंडर २०२५ चे लोकार्पण करण्यात आले.संचलन कु.प्रियंका वाघ मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.गायत्री मिसळकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन निर्माता डॉ रतनलाल तायडे भोई, निवासी संपादक रामदासभाऊ तायडे यांनी, नियोजन कार्यकारी संपादक डॉ मयुरदादा तायडे, डॉ.सुरजकुमार तायडे यांनी तर कार्यक्रमाकरीता दिनेश पाटील बोचे,गजानन विठ्ठलराव नेमाडे, अमोल सावीकार,आकाश सावीकार, अभिजीत देशमुख,निखिल सावीकार यांनी परिश्रम घेतले.