सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय इथे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आदित्य कुमार शिंगाडे यांची सदिच्छा भेट .!
बल्लारपूर (का.प्र) : सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आदित्य कुमार शिंगाडे यांनी सदिच्छा भेट दिली. बल्लारपूर तालुक्यामधील बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय हे एक गोरगरिबांसाठी एकमेव रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये सर्वांना मोफत मध्ये उपचार व औषधी मिळतात.
माझे मार्गदर्शक व गुरु आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी माझी रुग्ण कल्याण समिती मध्ये आमदार प्रतिनिधी म्हणून 2021 साली नियुक्ती केली तेव्हापासून "रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा हे" ब्रीदवाक्य म्हणून ही चालत आलेलो आहे.