अतिक्रमणधारकांना पट्टे देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्या .!

आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती .!

चंद्रपूर (वि.प्र) : जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात महसूल जमिनीवरील अतिक्रमण धारकांना दिलासा देण्यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती आ. श्री. मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केली आहे.
चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात अतिक्रमणधारकांची संख्या मोठी आहे. घरकुल योजनेंतर्गत पट्टे वाटप केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थ्यांचे महसूली जमिनीवर अतिक्रमण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महसूल जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या हजारो रहिवाशांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. हे अतिक्रमण 2001 च्या पूर्वीचे असून महसुली जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याची मागणी लोकप्रतिनिधींमार्फत होत आहे. 
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून महसुल जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पट्टे देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.