ऐतिहासिक निर्णयांचा धडाका लावणारा हेविवेट नेता - सुधीर मुनगंटीवार म्हणजे धडधडती तोफ

बल्लारपुर (का.प्र.) : ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही… पराक्रमावाचून पोवाडा नाही’ अशी म्हण प्रचलित आहे. इतरांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जिद्दीने शक्य करून दाखविणाऱ्याची कामगिरी एखाद्या चमत्कारासारखी असते. असा पराक्रम करणाऱ्याचेच पोवाडे गायले जातात. राज्याचे भाजपाचे हेविवेट नेते धडधडती तोफ म्हणून ज्यांची ओळख आहे अशा सुधीर मुनगंटीवारांनी ऐतिसाहिक निर्णयांचा धडाका लावत आपली कारकीर्द गाजवली आहे. या हेविवेट नेत्याने दुर्लक्षित खात्यांना जीवनदान दिले. पहिले ग्राहक संरक्षण आता वन,सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय.
राज्याच्या या नेत्याकडे ‘नाही’ हा शब्द डिक्शनरीत शोधून सापडणार नाही, अशा नेत्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा आवर्जून उल्लेख होतो. नकारघंटा वाजवण्यापेक्षा आपल्याकडे येणाऱ्याला मदत कशी होईल, त्याची समस्या कशी सुटेल याचा प्रामाणिक प्रयत्न मुनगंटीवार करतात. अडिच दशकांपूर्वी राज्यात युतीचे सरकार असताना ते पहिल्यांदा मंत्री झाले. त्यावेळी ग्राहक संरक्षण व पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी महाराष्ट्राने बघितली आहे. त्यावेळी देखील ग्राहक संरक्षण खाते दुर्लक्षित होते. पण मुनगंटीवार यांनी या खात्याने नवसंजीवनी दिली. 
2014 मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ सोबतच वन खात्याची जबाबदारी आली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला 11975 कोटींचं सरप्लस बजेट देणारे ते एकमेव नेते ठरले. ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर’ म्हणून तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या हस्ते मुनगंटीवार यांना गौरविण्यात आले. केवळ ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशी घोषणा देऊन मुनगंटीवार थांबले नाहीत. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात 50 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबवली. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुकने त्याची नोंद घेतली. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धन म्हणजे काय, हे प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी दाखवून दिले. 
2022 मध्ये राज्यात महायुतीचे सरकार आले. मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय खाते सोपवण्यात आले. सांस्कृतिक खात्याला फक्त नाट्य स्पर्धा आणि कलावंतांच्या मानधनापुरता महत्त्व होते. फारतर सांस्कृतिक पुरस्कारांमधून होणाऱ्या मनोरंजनाच्या दृष्टीने बघितले जायचे. पण मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक खात्यामध्ये जीव ओतला. त्याला सर्वसमावेशक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त त्यांनी आयोजित केलेल्या उपक्रमांमधून त्याची प्रचिती आली. 

खऱ्या अर्थाने सांस्कृतिक 'कार्य' :

याच खात्याच्या माध्यमातून मुनगंटीवार यांनी लंडन येथून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणली. अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सांस्कृतिक ‘कार्य’ करणारा नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राला नव्याने ओळख झाली. मत्स्यव्यवसाय खाते तर जवळपास कुणालाही माहिती नव्हते पण मुनगंटीवार यांनी या खात्यातून महाराष्ट्रातील मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांना, मासेमारीवर पोट भरणाऱ्यांना दिलासा दिला. अनेक योजना आणत मत्स्यव्यवसाय बांधवांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले.

म्हणूनच शंभर टक्के यश :

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या म्हणीची प्रचिती सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कृतीमधून वारंवार दिली आहे. यश आणि अपयशाची चिंता न करता प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असं ते म्हणत असतात. कमालीची सकारात्मकता, तत्परता आणि पाठपुरावा या त्रिसूत्रीवर ते काम करतात. म्हणूनच ते शंभर टक्के यशस्वी देखील होतात.

सकल हिंदू समाज एकवटला .. बांगलादेश हिंदुच्या समर्थनार्थ चंद्रपूरात “न्याय यात्रा”.!

चंद्रपूर : बांगलादेशातील हिंदू, सिख, बौध्द, जैन, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजावर इस्लामिक अतिरेक्यांनी मागील अनेक महिन्यापासून अत्याचार सुरु केले. ज्यात हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ, हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या धर्मिक स्थळांची विटंबना सुरु केली आहे. या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावेल उचलण्या ऐवजी सद्याचे बांगलादेश सरकार व इतर संबधित यंत्रणा मूक प्रेक्षक बनून राहिल्या आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवण्याचा अवलंब केला तेव्हा अन्याय आणि अत्याचाराचा एक नवीन टप्पा दिसून येतो आहे. हिंदुच्या अशा शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे संन्यासी पूज्य श्री चिन्मय कृष्ण दास जी यांना बांगलादेश सरकारने अटक करणे अन्यायकारक आहे.
या गंभीर प्रसंगी भारत सरकार व आंतरराष्ट्रीय संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून ते एकटे नसून संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी आहे हा भाव व्यक्त करण्याकरीता चंद्रपुरात मंगळवारी 10 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता भव्य न्याय यात्रा काढण्यात आली. या न्याय यात्रेत चंद्रपूर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने नागरीक महिला वर्ग उपस्थित होते. विविध समाजतील समाज बांधव, अल्पसंख्याक समाजातील धर्मगुरू, जेष्ठनागरिक , महिला वर्ग व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आ.किशोर जोरगेवार या न्याय यात्रेत सहभागी झाले होते. 
न्याय यात्रा हि गांधी चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता झाली. निवासी जिल्हाधिकारी यांना सकल हिंदू समाज, चंद्रपूर तर्फे निवेदन देण्यात देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक दीपक जी तामशेट्टीवार ,जिल्हा संघचालक तुषार जी देवपूजारी,तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, नगर संघचालक रवींद्रजी भागवत, शीख समाजाचे चमकौर सिंग, बौद्ध समाजाचे धम्म् म भन्ते जी, इस्कॉन चे रमेश जी बिराजदार, स्नेहाताई मिसार, प्राजक्ता भालेकर ताई, अशोक जीवतोडे, शैलेश जी बागला, शवारकरी चे मेश्राम हे उपस्थित होते.

सकल हिंदू समाजाच्या प्रमुख मागण्या :

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरुद्ध तेथील सरकारला भारत सरकारकडून कठोर इशारा दिला जावा, मानवाधिकारवादी संघटनांनी हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकावरील हल्ल्याची, अत्याचाराची दखल घेऊन हा मुद्दा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा, बांगलादेशातील हिंदूंच्या जीविताचे आणि संपत्तीचे रक्षण तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घातला जावा, इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्णदास यांची तुरुंगातून तत्काळ स-सन्मान मुक्तता करण्यात यावी, हिंदू कलाकार, व्यावसायिक, उद्योगपती, खेळाडू, राजकीय नेते तसेच हिंदू मंदिरांना सुरक्षा पुरविली जावी, बांगलादेशातील पाकिस्तानी जिहाद्यांच्या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, संयुक्त राष्ट्रसंघात हिंदू, बौद्ध, खिश्चन व अन्य अल्पसंख्यकांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला जावा, बांगलादेशातील अल्पसंख्य समाजाच्या रक्षणाची मागणी करणाऱ्या देशोदेशीच्या विविध आंदोलनांना सुरक्षा प्रदान केली जावी, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.


आदिवासी समाजाच्या प्रगती व उत्थानासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील - आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

पुढील पाच वर्ष मतदारांची सेवा करण्याचा संकल्प ..आदिवासी बांधवांकडून आ. मुनगंटीवार यांचा जाहिर सत्कार ..!

चंद्रपूर : राणी दुर्गावतीचे शौर्य व सेवेची आठवण करण्याचा हा दिवस आहे. राणी दुर्गावतीने राज्य चालविण्यासाठी जनकल्याणकारी योजना राबविल्या.महायुती सरकारने याच आदर्शांवर आदिवासी समाजाच्या कल्याणाचा ध्यास घेतला. आदिवासींना आता त्यांच्या भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. आदिवासी समाजातील गरीब कुटुंबांना घर देण्याचा निर्णय, तसेच 12 हजार 500 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावामध्ये गोटूलला मंजुरी दिली. आदिवासींच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असून आदिवासी समाजाच्या प्रगती व उत्थानासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील,अशी ग्वाही आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा येथे आदिवासी समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे, गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे संघटक जगन येलके, माजी जि.प.सदस्य राहुल संतोषवार, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, हरीश ढवस, गणेश परचाके, प्रेमदास इस्टाम, प्रवीण पेंदोर, विजय आत्राम, मधुकर कुळमेथे, कांताबाई मडावी, विनोद देशमुख, ईश्वर नैताम, ऋषी कोटरंगे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सिंचन,आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रात लक्ष देण्यात येत असून विशेष करून विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे जावा यासाठी नाविन्यपूर्ण योजना आखण्यात येत आहे. पोंभुर्ण्याचा कायापालट व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशिल आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता येईल. मुल येथे पॉलीटेक्निक कॉलेज तसेच 40 हजार कोटीची गुंतवणूक करून पोंभुर्णा एमआयडीसीतील उद्योग, शेती, आरोग्य अशा महत्त्वपूर्ण पाच प्रमुख मुद्द्यांवर काम सुरू करण्यात आले आहे. पुढील पाच वर्षे पुन्हा मतदारांची सेवा करण्याचा संकल्प आहे. मतदार अडचणीत असल्यास मतदारांना मदतीचा हात आपला असावा या भावनेतून काम करण्यात येत असल्याचेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

मतदारांचे मानले आभार : 

पोंभुर्णावासियांनी प्रेमाने स्वागत आणि सत्कार केला. हे प्रेम पुढचे पाच वर्ष या मतदारसंघाची मनापासून सेवा करण्यासाठीची शक्ती आहे. मतदार हा ईश्वराचा अंश आहे . जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याने बल्लारपूर मतदारसंघातील जनतेने मला 25 हजार 985 मतांनी निवडून दिल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.

लाडक्या बहिणीची साथ :

विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींमध्ये सर्वात जास्त ऊर्जा पाहायला मिळाली. महायुतीच्या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा वाटा मोठा असल्याचे नमूद करत लाडक्या बहिणींच्या पाठीशी विविध उपक्रमाच्या माध्यमातून कायम उभा राहील अशी ग्वाही आ. मुनगंटीवार यांनी दिली. जगन येलके, गणेश परचाके व त्यांच्या टीमला विशेष करून आ. मुनगंटीवार यांनी धन्यवाद दिले. याच मैदानावर समर्थन व पाठिंबा देत मला निवडून आणण्यासाठी शक्ती पणाला लावली. येथील भाजपा नेते, कार्यकर्ते आणि मतदारांनी या निवडणुकीत स्वतःच उमेदवार आहे या भावनेने निवडणुकीच्या युद्धामध्ये पूर्ण शक्तीनिशी काम केले व मला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असल्याचे ना.मुनगंटीवार म्हणाले.

पोंभुर्णानगरीत ना. मुनगंटीवारांचे जंगी स्वागत :

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टी, पोंभुर्णाच्या वतीने विजयी अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले. जनतेच्या मतरुपी आशिर्वादाने विजय मिळवून दिला. त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे आ.मुनगंटीवार यांनी मनापासून आभार मानले.




Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.