बल्लारपूर (का.प्र.) : बल्लारपुर शहरातील जेष्ठ शिक्षक व चंद्रपुर जिल्हा रेल्वे यात्री असोसिऐशन बल्हारशाहचे सक्रिय सदस्य गणेश सैदाने यांची मध्य रेल्वे जोन, नागपुर रेल्वे मंडलच्या डीआरयूसीसी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
चंद्रपुर जिल्हा रेल्वे यात्री असोसिऐशन बल्हारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुन्चूवार यांच्या शिफारशीवरून नागपूर रेल्वे मंडलाने डीआरयूसीसी समिती मध्ये नियुक्ती केली आहे.
गणेश सैदाने यांनी आपली नियुक्तीबद्दल केंद्रीय ओ बी सी आयोगचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर, माजी पालक मंत्री व आमदार सुधीर मुनगंटिवार , जेष्ठ नेता व माजी अध्यक्ष वन विकास महामंडल चंदन सिंह चंदेल आणि चंद्रपुर जिल्हा रेल्वे यात्री असोसिऐशन बल्हारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुन्चूवार यांचे विशेष आभार मानले आहेत.
गणेश सैदाने यांची नियुक्ती झाल्याबद्दल चंद्रपुर जिल्हा रेल्वे यात्री असोसिऐशन बल्हारशाहचे सचिव प्रशांत विघ्नेश्चर, उपाध्यक्ष अब्दुल रफीक,सहसचिव विकास राजुरकर, श्रीनिवास कंदकुरी, ज्ञानेंद्र आर्य ,रामेश्वर पासवान, किशोर इटनकर,विलास कवरासे,दिलीप वनकर,नरेंद्र सेंगर,श्रीकांत इटनकर आणि अजय मंगरुडकर आदींनी अभिनंदन केले आहे.