बल्लारपुर (का.प्र.) : भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम दि ३ डिसेंबर २०२४ ला आयोजित करण्यात आला. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी चुकीच्या समजतीमुळे या आजारातीला रूग्णाला समाजातील लोक बहिष्कृत करतात असे मार्गदर्शन केले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रमुख मार्गदर्शक शितल भाडके, ग्रामीण रुग्णालय भद्रावती, प्रमुख अतिथी पुनम चुनारकर, निशा वखनोर विहाण चंद्रपूर तसेच दर्शना मून संबोधन ट्रस्ट चंद्रपूर हे व्यासपीठावर उपस्थित होते. आजच्या चंगळवादी, धकाधकीच्या जीवनात विविध आजारांनी थैमान घातले असताना एड्स हा आजार आज मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. याबद्दलचे योग्य ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, विद्यार्थ्यांनी गैरसमजुती तून मुक्त व्हावे यासाठी जागतिक एड्स दिनानिमित्त जागृकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून शितल भटके यांनी या आजारासंबंधीची विस्तृत अशी माहिती दिली. त्याची कारणे, उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी काही वैयक्तिक वैद्यकीय समस्या असल्यास ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील २१ क्रमांकाचे रूममध्ये यावे व समुपदेशन करून घ्यावे असेही मार्गदर्शन केले. तसेच समग्र विहान काळजी व आधार केंद्र चंद्रपूरच्या पुनम चुरारकर, निशा वखनोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई द्वारा संचालित संबोधन ट्रस्ट चंद्रपूर च्या दर्शना मून मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर ढोक यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. उज्वला वानखेडे, प्रेमा पोटदुखे, संगीता जक्कुलवार, माधव केंद्रे, कमलाकर हवाईकर, डॉ प्रशांत पाठक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला समस्त प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.