बामणी (का.प्र .) : बामणी येथे जय हनुमान व्यायाम शाळा बामणी दुधोली यांच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी सामन्याचे आयोयान २७ डिसेंबर ते 29 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन श्री.चंदनसिह चंदेल आणि श्री.नरेन्द्र सिह दारी तसेच श्री.रणजित सिंह आणि श्री.रुमदेव डेरकरआणि श्री चंद्रकात देऊळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
विशेष अतिथी म्हणून बामणी गावाचे उपसरपंच श्री सुभाष ताजने, ग्रा. सदस्य जमील शेख , श्रीमती विजया मडावी, श्री.संजय गोंधळी, श्रीमती सरला जुवारे आणि गावातील नागरिक श्री मनोज साळवे, श्री.देवा भाऊ कांबळे, श्री. पवन साळवे हे उपस्थित होते.
गट ब प्रथम पुरस्कार २५०००/दुसरे १००००/ क गट साठी १५०००/आणि दुसरे १००००/आणीआकर्षक चशक. आणी मैन ऑफ दी सिरीज आणि अनेक बक्षिस स्पर्धकांना मिळणार असून या स्पर्धेत जास्तीत जास्त टीम ने सहभाग घ्यावा असे आवाहन स्पर्धेचे आयोजक अधक्ष ओम कांबळे, उपाधक्ष शुभम डेरकर, सचिव धीरज साळवे, सहसचिव रोशन निवलकर कोषधक्ष नयन साळवे , क्रीडा प्रमुख शुभम वासेकर , साचलन हर्षल साळवे यांनी केले आहे.