बल्लारपुर (का.प्र.) : बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे मुख्य वाहतूक निरीक्षक उमाकांत दास यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नमो रेल्वे पैसेंजर वेलफेयर एसोसिएशन ऑल इंडिया यांनी त्यांचे भावनिक स्वागत केले. यावेळी मध्य रेल्वेचे बल्लारशाह क्षेत्र अधिकारी संजीव जैन, ZRUCC सदस्य अजय दुबे, कामगार नेते सुजित निर्मल, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राम मिलन यादव, पत्रकार श्रीनिवास कंदकुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
एसो.चे अध्यक्ष अजय दुबे यांनी दास यांचा सत्कार केल्यानंतर सांगितले की, त्यांनी आपला कार्यकाळ प्रामाणिकपणे पार पाडला आणि रेल्वे प्रशासन आणि सामाजिक वर्गाशी समन्वय साधण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
आपल्या स्वागतपर भाषणात दास यांनी बल्लारशाह हे त्यांची कर्मभूमि असल्याचे सांगितले मला इथे खुप साहचर्य, माणसे आणि प्रेम मिळाले.
या वेळी संतोष यादव, शालिक गोरडवार, रवी चिल्का, बालाजी गुट्टे, रामजनम चक्रवर्ती, बुधराज निषाद, राजू बोड्डू, पवन केशकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.