महामानवाला शिस्तबद्ध अभिवादन .!

बल्लारपूर (का.प्र.) : महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्य दि.६ डिंसे. रोज शुक्रवारला सायं ६:३० वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक भद्रावती येथील बाबासाहेबांच्या पुतळ्या समोर समता सैनिक दल शाखा भद्रावती मार्फत मानवंदना देण्यात आली.
समता सैनिक दल हे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी समाजामधे शिस्त, संयम आणि सातत्य असावे म्हणुन या करीता निर्माण केले आणि हेच समता सैनिक दलाचे ब्रिद वाक्य आहे. मानवंदने करीता भद्रावती परिसरातील उपासक उपासिका विद्यार्थी व समता सैनिक दलाचे मार्शल मोठ्या संख्येने उपस्थित होते. समता सैनिक दलाचे शिस्तबद्ध अभिवादन ह्या वेळेस आकर्षणाचे केंद्र बिंदु ठरले. समता सैनिक दलाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा.अविनाश दिग्विजय सर, मा.सतिश पाटील आणि मा.विश्वास भगत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून दिपप्रज्वलन केले. सहसंघटक महा.राज्य मा.सुनिल मेश्राम सर, स्टेट प्रोग्रामर मा.कमलाकर काटकर सर, मा.अशोक पाझारे सर, ससैदल तालुका तथा शहर शाखेचे संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमांडीग मार्शल संदिप तायडे सर व सुत्रसंचलन मार्शल विजय लभाने सर ह्यांनी केले. शेवटी सरणतय गाथा घेऊन अभिवादनांचे समापण करण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.