अन्न नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांशी सकारात्मक चर्चा .. शेतकऱ्यांप्रती आ. मुनगंटीवार यांची संवेदनशीलता .!
चंद्रपूर (वि.प्र.) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या आणखी एका प्रश्नासाठी पुढे सरसावले आहेत. धान खरेदीची मुदत 31 डिसेंबर 2024 ठेवण्यात आली आहे. पण, ही मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवून द्यावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे.
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत धान खरेदीची मुदत वाढविण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव श्री.रणजितसिंह देओल यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेनंतर प्रधान सचिवांनी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत वाढवून देण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. खरीप पणन हंगाम 2024-2025 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरीता दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकरी तसेच अभिकर्ता संस्थांनी मुदतवाढीची मागणी केली आहे, असे आ. श्री. मुनगंटीवार यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्राद्वारे कळविले आहे.
पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे. त्याचवेळी प्रधान सचिवांशी चर्चा करून हा विषय अत्यंत तातडीचा असल्याची बाब आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिली आहे.
शेतकऱ्यांप्रती संवेदनशील :
आ. श्री. मुनगंटीवार पालकमंत्री असताना त्यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटींची रक्कम मिळू शकली. शेतकऱ्याच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन धान उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सदैव शेतकऱ्यांप्रती आ. श्री सुधीर मुनगंटीवार संवेदनशील असतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
सौ.आरती - साईंल - गणेश रहिकवार