भारतीय संविधान वाचविण्यात पत्रकारांची भुमिका महत्वाची - ठाणेदार संतोष बाकल

चिमुरात व्हाईस ऑफ मिडीयाने साजरा केला मराठी पत्रकार दिन .!

चिमूर (वि.प्र.) : स्वातंत्र्यपूर्व काळापासुन समाज जीवनात पत्रकारांची भुमिका हि महत्वपुर्ण राहील्याचा इतिहास आहे. देशाच्या प्रगतीमध्ये शैक्षणिक, राजकीय, तांत्रिक, वैद्यकीय व अन्य क्षेत्रातील व्यक्तींचे योगदान असले तरी यात पत्रकारांच्या कामाची दखल विशेष अधोरेखीत करण्यासारखी आहे. भारतीय लोकशाही वाचविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत. यात पत्रकारांची भुमिका महत्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन ठाणेदार संतोष बाकल यांनी केले.
चिमुर तालुका व्हाईस ऑफ मिडीयाचे वतीने श्रीहरी बालाजी देवस्थान सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्राचे वर्धापन दिनानिमित्य मराठी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ठाणेदार संतोष बाकल बोलत होते.
यावेळी मंचावर रत्नमाला नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव अमित भिमटे, प्रशिक्षणार्थी पीएसआय जाधव, चिमुरचा छोकरा यु ट्युबचे आशिष बोबडे, व्हाईस ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष प्रा. राजु रामटेके, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीहरी सातपूते, माजी तालुका अध्यक्ष रामदास हेमके आदी मान्यवर उपस्थित होते.
शासकीय, प्रशासकीय यंत्रणेसारखेच पत्रकारीता क्षेत्रात सुध्दा काही प्रमाणात नकारार्थी प्रवृत्तीचा शिरकाव झालेला आहे. याकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचार व व्यक्तीकडे लक्ष केंद्रीत केल्यास समाजासोबतच व्यक्तीमत्वाचा सुध्दा विकास होवु शकतो अशा आशयाचे सविस्तर मार्गदर्शन ठाणेदार बाकल यांनी केले. अमित भिमटे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेत त्यांच्या विचारांचा उपयोग पत्रकारांनी करावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. राजु रामटेके यांनी पत्रकारांचे नितीमूल्य व समाजाचा पत्रकारीता क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र सहारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार योगेश सहारे यांनी मानले. कार्यक्रमाला व्हाईस ऑफ मिडीया (साप्ताहिक विंग) चे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश डांगे, विकास खोब्रागडे, संजय नागदेवते, गुणवंत चटपकार, सुनिल हिंगणकर, प्रमोद राऊत, फिरोज पठाण, उमेश शंभरकर, विलास मोहीनकर, रामदास ठुसे, शार्दुल पचारे, रामचंद्र कामडी, भरत बंडे यांचेसह अनेक पत्रकार उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.