माजी विद्यार्थी हे शाळेतील सुवर्ण वैभव - डॉ.जयंत वानखेडे

 यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न .!
 शालेय जीवनातील स्मृती जागृत झाल्या - प्रफुल्ल चटकी 

भद्रावती (वि.प्र.) : भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे काल दिनांक २२/३/२०२५ ला माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला. या माजी विद्यार्थी मेळाव्याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला व आपल्या भावना व्यक्त केल्या.
यशवंतराव शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या वतीने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त त्याचा माजी प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी प्रफुल चटके माजी नगरसेवक तथा राजू सारंगधर माजी नगरसेवक प्राचार्य डॉ सुधीर मोते हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन झाली.
माझी विद्यार्थी मिळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ जयंत वानखेडे सर माझी प्राचार्य तथा वेळेस विस्वथ्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माजी विद्यार्थी हे या शाळेचे वैभव आहे आपण अनेक क्षेत्रात उत्तम व्यक्तिमत्व म्हणून काम करत आहात याचा आम्हाला अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रफुल चटके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा मिळाला व अनेक मित्र या ठिकाणी पुन्हा एकदा भेटले त्यांच्याशी संवाद साधून आत्मिक समाधान झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला यावेळी माजी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्राध्यापक रमेश चव्हाण, प्राध्यापक जुमडे सर चौधरी सर तसेच सर्व शिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांनी सत्कार, सन्मान केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.


इनरव्हील क्लब ऑफ भद्रावतीची OCV बैठक संपन्न .!

भद्रावती : इनरव्हील क्लब ऑफ भद्रावतीची OCV (ऑफिशियल क्लब व्हिजिट) बैठक क्लबच्या अध्यक्षा प्रा. प्रेमा पोटदुखे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. याप्रसंगी क्लबच्या सामाजिक प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थिनींना आवश्यक असलेली सॅनिटरी वेंडिंग मशीन यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती ला देण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन इनरव्हील क्लबच्या जिल्हाध्यक्षा सौ जयश्री पोफळे, भद्रावती ईनरव्हील क्लब च्य अध्यक्षा सौ प्रेमा पोटदुखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर मोते, डॉ. ज्ञानेश हटवार, प्रा. माधव केंद्रे, प्रा. प्रेमा पोटदुखे, मनोज बांदुरकर, वर्षा दोडके आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्रायोजक म्हणून रोटेरियन सुनील पोटदुखे व समाजसेवक प्रा. धनराज आस्वले यांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थिनींच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या प्रकल्पाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात इनरव्हील क्लबच्या किर्ती गोहाणे, रश्मी बिसेन, प्राचार्य वर्षा धनोरकर, मनिषा ढोमणे, विभा बेहरें, वैशाली सातपुते, राजेश्री बत्तीनवार, कविता सुफी, विश्रांती उराडे, स्वाती चारी व त्रिशा नंदेश्वर यांनी विशेष सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".