विश्वातील बौध्दांच्या आस्थेचं केंद्रबिंदू महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात आक्रोश मोर्च्याचे आयोजन ..!
बल्लारपुर (वि.प्र.) : विश्वातील तमाम बौध्दांच्या आस्थेचं केंद्रबिंदू असलेल्या महाबोधी बौध्दविहार मुक्तीसाठी देश विदेशातील पूज्यनीय धम्मगुरू भंतेजीनी मागील 21 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरवात केलेली आहे.आणि हा आंदोलनाचा शेवटचाच टप्पा समजावे लागेल. कारण हे देशव्यापी आंदोलन नसून याला विश्वव्यापी आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. याठिकाणी अनेक देशातील पूज्य. भंतेजी सहभागी झालेले आहेत. त्यांच्या समर्थनात भारतातील प्रत्येक राज्यातून जिल्ह्यातून तालुक्यातून शहरातून विशेषतः गावागावातून आक्रोश मोर्च्याचे आयोजन करून तेथील ब्राम्हण मनुवादी पंड्याच्या विरोधात आणि B.T.M.C. ऍक्ट 1949 पूर्णपणे रद्द ,निरंक करण्याच्या मागणी संदर्भात आपापल्या परिसरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संबंधितांना वर्ग करण्यासाठी, पाठविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 10/03/2025 रोज सोमवारला दुर्गापूर-ऊर्जानगर संविधान संरक्षण समितीद्वारा आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्च्या दुर्गापूर नगरातील मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून सकाळी 11.30 वा. प्रारंभ होईल. मुख्यमार्गानी पदक्रमीत करीत छ.शिवाजी महाराज यांच्या स्मारक चौकात प्रस्थान करेल.त्यानंतर दुर्गापूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार मा.प्रकाश राऊत यांना निवेदन सादर करून देशाचे पंतप्रधान,संबंधित राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती यांना वर्ग करण्याची पाठविण्याची विनंती करण्यात येईल. तेव्हा दुर्गापूर -ऊर्जानगर परीक्षेत्रातील समस्त बौद्ध विहार कमेटी, आंबेडकरी संघटना, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत बहुजन बंधू-भगिनींनो विशेषतः युवक -युवतीनो या सगळयांनी आपापली जबाबदारी स्वीकारून आयोजित आक्रोश मोर्च्या मध्ये हजारोच्या संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन संविधान संरक्षण समिती द्वारा करण्यात येत आहे. आणि आपण ते स्वीकारालचं अशी अपेक्षा देखील आहे.