महात्मा फुले महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे प्रशासकीय कार्यालयांना अभ्यास भेट, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले ..!
बल्लारपूर (का.प्र.) : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथील " राज्यशास्त्र विभागाच्या " वतीने ओळख स्थानिक स्वराज्य संस्थेची अंतर्गत अभ्यास भेटीचे आयोजन दि. 12 मार्च 2025 ला करण्यात आले होते या अंतर्गत बल्लारपूर येथील प्राचीन गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला भेट देऊन गोंडकालीन राजकीय व्यवस्था कशी होती तेथील राज्यकारभार कशाप्रकारे चालत होता या शिवाय गोंडकालीन ऐतिहासिक व राजकीय दृष्ट्या महत्व याविषयीं माहिती जाणून घेतली यासोबतच गोंडकालीन राजकीय व्यवस्था कशी होती याविषयींची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या शिवाय " ओळख स्थानिक स्वराज्य संस्थेची " अंतर्गत बल्लारपूर शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व पंचायत समिती अशा अनेक प्रशासकीय कार्यालयाना भेटी देऊन तेथील कामकाजा विषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात माहिती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून मा. महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार बल्लारपूर, मा. प्रा. डॉ. किशोर चौरे, (इतिहास विभाग), [मा. प्रा. मोहनीश माकोडे, मा.प्रा. दिपक भगत] (राज्यशास्त्र विभाग), मा. प्रा.जयेश गजरे(इंग्रजी विभाग) ई ची उपस्थिती होती यावेळी माहिती देतांना प्रशासकीय अधिकारी म्हणून मा. महेंद्र फुलझेले नायब-तहसीलदार बल्लारपूर यांनी विद्यार्थ्यांना " महसूल प्रशासन अंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामे तसेच समस्यांची सोडवणूक कशाप्रकारे केली जाते तसेच जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय व्यवस्था कशी असते याविषयींची माहिती दिली तसेच वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक सुजाण नागरिकांनी आपले मतदानाचे हक्क बजावून आपले कर्तव्य पार पाडावे व इतरांनाही मतदार जागृती करावी असे यावेळी आवाहन केले सोबतच प्रत्येक विद्यार्थ्यानी योग्य अभ्यास व वाचन करून प्रशासकीय कार्यात सेवा द्यावी व देशाच्या विकासात मदत करावी असे आवाहन केले. " या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. मोहनीश माकोडे यांनी केले यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.