कनिष्ठ महाविद्यालय मराठी शिक्षक महासंघ भद्रावती चे तहसीलदारांना निवेदन .!
भद्रावती (वि.प्र.) : महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत मराठी हा विषय अनिवार्य असा शासन निर्णय दिनांक १३ सप्टेंबर २०२४ ला पारित केला. त्या परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी विषय अनिवार्य करण्यात यावा, या मागणीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, भद्रावती यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात मराठी विषय हा इयत्ता बारावी पर्यंत सर्वच विद्याशाखेत अनिवार्य करणे हा शासनाचा परिपत्रक निर्गमित झाले. त्या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी ही येत्या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी असे निवेदन भद्रावती चे तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. शिक्षणमंत्री यांना पाठवण्यात आले. मराठी ही राज्यभाषा असून तिचे संवर्धन व जतन हे शिक्षणाच्या माध्यमातून होणे आवश्यक असल्याचे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे. मराठी ही अभिजात भाषा आहे. महाराष्ट्रात शिक्षणात इयत्ता बारावी पर्यंत ती सर्वत्र अत्यावश्यक असावी.
हे निवेदन देताना मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश हटवार, जिल्हा मार्गदर्शक प्राचार्य डॉ सुधीर मोते, जिल्हा संघटक प्रा. किशोर ढोक, तालुका कार्याध्यक्ष प्रा. देवेंद्र पुसदेकर, डॉ प्रशांत पाठक, तालुका अध्यक्ष प्रा. स्वाती गुंडावार, प्रा. खोजराज कापगते आदी प्रमुखाने उपस्थितीत होते.
तहसीलदार साहेबांनी निवेदन स्वीकारून चर्चा केली व यासंबंधी वरिष्ठ पातळीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मराठी भाषेला शैक्षणिक पाठबळ मिळावे आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषिक अभिमान निर्माण व्हावा, हा या मागणीमागील मुख्य हेतू असून, शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.