बल्लारपुर (का.प्र.) : चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चंद्रपूर, रामनगर शांतता समिती व पोलिस दलाच्या वतीने चंद्रपूर शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीतील भक्तगणांचे अतिशय आनंदाने व उत्साहाने जयंत टाकीज, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे परिसराजवळील चर्च समोर रामनवमीच्या शुभेच्छा देत गुलाब पुष्प देऊन सर्व भक्तगणांचे स्वागत करण्यात आले.
रामनवमीच्या या पावन प्रसंगी पोलिस दल,शांतता समिती च्या वतीने शुभेच्छांचा माध्यमातून बंधुभावाचा संदेश देण्यात आला आहे मात्र विशेष! चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा असून याला कोणाची नजर लागू नये याकरिता व बंधुभाव नेहमी कायम राहावा म्हणून हा प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण की शांतता समितीच्या वतीने जेव्हा भक्तगणांना शुभेच्छा दिल्या जात होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एक विशेष आनंद दिसून येत होता. चंद्रपूर जिल्ह्याचे नावलौकिक कायम राहावे जातीय सलोखा कायम रहावा या उदात्तहेतूने शुभेच्छा स्वागताचा हा उपक्रम राबविण्यात आला.
रामनवमीच्या या मिरवणुकीत माजी मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार, मनीषजी महाराज, यांना रामनवमीच्या शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. रामनवमीच्या या मिरवणुकीत नरेंद्र मुंधळा, बागलाजी, गहलोतजी, गिरीश चांडक, रघुवीर अहिर,किशोर जोरगेवार, तुषार सोम, दशरथ ठाकूर,जयस्वाल, सह अनेक मान्यवरांना शुभेच्छा देऊन त्यांचे ही स्वागत शांतता समितीच्या वतीने करण्यात आले.
या शुभेच्छा स्वागत कार्यक्रमाप्रसंगी चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सर्वश्री सय्यद रमजान अली, सदानंद खत्री,बाळू भाऊ खोब्रागडे, बापू अन्सारी, शालिनी भगत, शहर व रामनगर शांतता समिती सदस्य सागर खोब्रागडे, गुलाब पंडित पाटील, मोरेश्वर खैरे,श्रीमती रेखा धनंजय दानव, धीरज शेडमाके, अजय वैरागडे, सचिन पाटील, प्रेरणा करमरकर,शांतता समिती सदस्य राजू बन्सीलाल राठोड, दर्शन बुरडकर, शरद रामटेके, किशोर रामटेके, राजू खोब्रागडे, जाहिद हुसेन, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.