निषाद पार्टीची सभा संपन्न
(जातीगत जनगणनेत गर्वा ने आपली जात सांगा - कैलाश केवदे)
नागपूर (वि.प्र.) : 15 जुन 2025 रोजी आमदार निवास नागपुर येथे निषाद पार्टी ची सभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलाश केवदे यांच्या अध्यक्षतेत जातीगत जनगणना व आगामी निवडणूक विषयावर चर्चा हेतु आयोजित केली होती. सभेत प्रकाशजी लोणारे, चंद्रकांत लोणारे, मनोज बावणे, मोहनलाल बाथो, विदर्भ अध्यक्षा महिला मोर्चा कोमलताई बावणे, शारदा भारसागडे, मनिष बाथो, सुतेश बारबते, प्रमोद बावणे, देवानंद आमझरे, अनिल गौर, ओम गौर, आशा निषाद इत्यादींनी आपले मत व्यक्त केले. या सर्व मता नंतर निर्णय घेण्यात आले की मच्छीमार समाज जसे की भोई, केवट, कहार, ढिवर, निषाद अशी भटक्या जमाती मधील ३७ जातींनी जनगणनाच्या वेळेस निसंकोच आपली जात सांगितली पाहिजे. तसेच स्पष्ट रुपाने सांगावे की भटक्या जमाती व या वर्गात येणारी सर्व जात मच्छीमार आहे. म्हणून संपूर्ण भारतात मच्छीमार समाजाची जनसंख्या किती याची योग्य नोंद होणार. भारतात सर्वप्रथम वर्ष १९३१ मध्ये जातीगत जनगणना झाली होती. तेव्हा ओबीसी वर्गाची जनसंख्या ही 52 टक्के होती परंतु त्यावेळेस ओबीसी समाज जागृत नसल्यामुळे रिकॉर्ड मध्ये ओबीसी वर्गाची जनसंख्या 27 टक्के नोंदविण्यात आली यामुळे ओबीसी वर्गाला 27 टक्के आरक्षण देण्यात आले परंतु आताचा 52 टक्के ओबीसी समाज जेवढी संख्या तेवढे अधिकार मांगत आहे जे संध्यातरी संभव दिसत नाही. हे सर्व ओबिसी समाज जागृत नसल्यामुळे घडले आहे पंरतु १९३१ च्या नंतर या शासनात जातीगत जनगणना होत आहे. म्हणून मच्छीमार समाजाने सर्व बाबी लक्षात ठेवून लाज न करता निसंकोच पणे आपली जात जी शाळेच्या लिविंग व कास्ट सर्टिफिकेट मध्ये लिहीली आहे तीच जात जातीगत जनगणनाच्या वेळेस सांगावी. भटक्या जमाती 'ब' वर्गात येणारी सर्व जाती ने लक्षात ठेवावे की आम्ही मच्छीमार आहोत, हे जात सांगितल्या नंतर नोंदवून घ्यावे. जेणे करुन संपूर्ण भारतात आपल्या समाजाची योग्य जनसंख्या मोजण्यात येणार.
तसेच १५ जुन २०२५ रोजी फादर्स डे असल्यामुळे निषाद पार्टी ने समाजाच्या सक्रिय कर्तृत्वान वडीलांचा सत्कार केला. ज्यामध्ये खुशालचंद नायक, गेंदलाल गौर, किशोर बावणे, गोपाल ताराचंद गौर, श्रीकृष्ण भारसागडे इत्यादींचा सत्कार केला तसेच निषाद पार्टी चे गाडीवर लावणाऱ्या स्टिकर चे अनावरण करण्यात आले. सभेचा संपूर्ण नियोजन व सूत्र संचालन विदर्भ अध्यक्ष राहुलजी गौर नी केले. सभा यशस्वी करण्या करिता यजविंदर गौर, सीमा गौर, ममता गौर, सुमित्रा वऱ्हाडे, नर्मदा कुरवाडे, आयुष गौर यांनी अथक परिश्रम केले.