बल्लारपुर (का. प्र.) : स्पॉट चेक समिती, मध्य रेल्वे मुंबई यांच्या ५ जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीत ZRUCC सदस्य अजय दुबे यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. त्यांना ३६ मते मिळाली, तर डॉ. आदित्य पतकतराव (पुणे) यांना ३, किशोर भोरावत (सांगली) यांना १ आणि अनिता जाधव (नागपूर) यांना ५ मते मिळाली.
सहकार्याबद्दल अजय दुबे यांनी सर्व ZRUCC सदस्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी माजी कॅबिनेट मंत्री व आमदार मा. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत, कारण त्यांच्याच शिफारसीवर मा. रेल्वे मंत्री यांनी ZRUCC मध्ये त्यांची निवड केली होती. या अगोदर ते मध्य रेल्वे मुंबईतून NRUCC रेल्वे मंत्रालय, नवी दिल्लीसाठी निवडून गेले होते.