महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी भारत जोडो युवा यात्री प्रेरणाताई गौर नियुक्त .!
बल्लारपुर (का.प्र.) : अखिल भारतीय काँग्रेस चे राष्ट्रीय नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील 40 दिवस सोबत असलेल्या युवा यात्री, अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या समन्वयक म्हणुन, राजस्थान, तेलंगणा, महाराष्ट्र राज्यात पर्यवेक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडणा-या, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे माजी अध्यक्ष सुभाषसिंह गौर यांच्या सुकन्या कु. प्रेरणाताई गौर यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी केली असून पक्षाचे राष्ट्रीय संघटन महासचिव मा. के.सी. वेणुगोपाल यांनी नवीन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी घोषित केली आहे. या नियुक्तीबद्दल प्रेरणाताई गौर यांचे चंद्रपूरच्या जर्नलिस्ट व सहाय्यक प्राध्यापक माधुरी कटकोजवार यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


