नागपूर विभागात अव्वल .. यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश..!
भद्रावती (वि.प्र.) : महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे, विभागीय क्रीडा अधिकारी नागपूर तथा जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तायक्वांडो क्रीडा प्रकाराचे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धां वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथिल मुख्यमंत्री हॉल येथे आयोजित केले. या स्पर्धेत शर्विला हटवार याने नागपूर विभागात अव्वल स्थान प्राप्त केले. त्याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नागपूर विभागाच्या विभाग स्तरीय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथील मुख्यमंत्री सभागृहात आयोजित करण्यात आले. यात यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या तायक्वांडो क्रीडा प्रकारात शर्विल हटवार याने नागपूर व वर्धा प्रतिस्पर्धी खेळाडुंचा पराभव करून विजय संपादन केले, व नागपूर विभागात अव्वल ठरला. आता हा औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायकांनो क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
विभागीय स्पर्धेत तायक्वांडो या क्रीडा प्रकारात नागपूर विभागात विजय संपादन करून राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या या विजयी खेळाडूचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष, डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, विश्वस्त व माजी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ. सुधीर मोते यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती, क्रीडा शिक्षक प्रा. रमेश चव्हाण, प्रशिक्षक सतीश खेमस्कर, सौरभ सर, आदर्श सर, हेमंत सर, डॉ. ज्ञानेश हटवार , प्रा. किशोर ढोक, भीष्माचार्य बुरकुटे, प्रवीण मत्ते, राकेश आवारी, हरिहर मोहरकर, शुभम सोयाम, शिरीष उगे पत्रकार, समस्त प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले, व पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
