महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी .!

शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी .!

बल्लारपूर (का.प्र.) : दि.०२/१०/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता, शहर काँग्रेस कमेटीने गांधी पुतळा परिसरात महात्मा गांधींची १५६ वी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची १२१ वी जयंती साजरी केली.
सर्वप्रथम, उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या छायाचित्रांना पुष्प अर्पण करुण महात्मा गांधी यांचा पूर्णाकृति पुतल्याचे अभिवादन केले.
या प्रसंगी, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य म्हणाले,महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख राजकीय आणि आध्यात्मिक नेते होते.१९१५ मध्ये राजवैद्य जीवराम कालिदास यांनी गांधीजींना पहिल्यांदा महात्मा म्हणून संबोधले होते.दरवर्षी २ ऑक्टोबर हा दिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
तसेच, माजी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अब्दुल करीम शेख म्हणाले,लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते.त्यांना काशी विद्यापीठातून शास्त्री पदवी मिळाली होती.त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी नरेश गुंडलापेल्ली, मेहमूद पठाण, मोहम्मद फारुख, शेख रसीद (बाबू भाई), शुभम दिवसे,अमित मांडवकर, सादिक शेख, असलम शेख,साजिद सिद्दीकी,भास्कर येरनीवार, कैलाश धानोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".