"चंद्रपूर जिल्हा साहित्य संमेलन व पुस्तक प्रकाशनचे आयोजन.."

भद्रावतीत १२ आक्टो. २५  ला "चंद्रपूर जिल्हा साहित्य संमेलन व पुस्तक प्रकाशनचे आयोजन.." भद्रावतीत होणार साहित्यिकांची मांदियाळी... वि. सा. संघ नागपूर  शाखा भद्रावती चे आयोजन...!

भद्रावती (वि.प्र.) : विदर्भ साहित्य संघ, नागपूर शाखा भद्रावती द्वारे "चंद्रपूर जिल्हा साहित्य संमेलन" व "ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ ला श्री मंगल कार्यालय मेन रोड भद्रावती येथे आयोजित केले आहे. मराठी भाषा विद्यापीठ रिद्धिपुर चे कुलगुरू डॉ अविनाश आवलगावकर सर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहणार आहेत.
विदर्भ साहित्य संघ, नागपूर शाखा भद्रावतीच्या वतीने चंद्रपूर जिल्हा साहित्य संमेलन तसेच "ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोज रविवारला श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे आयोजित केला आहे. हे जिल्हा साहित्य संमेलन वि. सा. संघाचे सदस्य डॉ. सुरेश परसावार यांच्या स्मृतींना समर्पित आहे. या संमेलनाचे उद्घाटक प्रदीप दाते, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ नागपूर तर अध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर, कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर हे आहेत. या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी मा. प्रतिभाताई धानोरकर, खासदार, चंद्रपूर , मा. प्रा. डॉ. नामदार अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री चंद्रपूर, मा. सुधाकर अडबाले, शिक्षक आमदार नागपुर, मा. करण देवतळे आमदार वरोरा- भद्रावती विधानसभा, मा. डॉ. श्रीराम कावळे, प्रकुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, मा. विलास मानेकर, सरचिटणीस, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, प्राचार्य डॉ श्याम मोहरकर, चिटणीस व शाखा समन्वयक, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, डॉ गजानन कोटेवार, अध्यक्ष, ग्रंथालय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
या चंद्रपूर जिल्हा साहित्य संमेलनात डॉ ज्ञानेश हटवार लिखित "ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व" हे मधुश्री प्रकाशन पुणे मार्फत प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकावर भाष्यकार म्हणून प्रा. विजयाताई मारोतकर, ज्येष्ठ साहित्यिक, नागपूर तसेच प्रा. संपतराव गर्जे, ज्येष्ठ कवी व संत साहित्याचे अभ्यासक, पुणे हे भाष्य करणार आहेत .
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. परिसंवादाचा विषय  "अभिजात मराठी भाषा संवर्धन आणि विकास" हा आहे. या सत्राचे अध्यक्ष  प्रा. श्रीकांत पाटील, अध्यक्ष, लोक शिक्षण मंडळ वरोरा , प्रमुख अतिथी प्रा. बाळासाहेब माने साहित्यिक, मुंबई, तर या चर्चासत्रात व्याख्याते म्हणून मा. श्रीपाद अपराजित, संपादक महाराष्ट्र टाइम्स, नागपूर, प्रा. डॉ. सविता सादमवार, मराठी विभाग प्रमुख, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर प्रा. डॉ. परमानंद बावनकुळे, मराठी विभाग प्रमुख, चिंतामणी महाविद्यालय, पोंभूर्णा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात  खुले कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.   या सत्राचे अध्यक्ष चुडाराम बल्लारपुरे, साहित्यिक, गडचिरोली तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य ना. गो. थुटे सर ज्येष्ठ साहित्यिक, वरोरा, प्रा. डॉ विठ्ठल चौथाले, साहित्यिक , गडचिरोली हे उपस्थित राहणार आहेत. चौथ्या सत्रात समारोप कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर, प्रमुख अतिथी रवींद्र शिंदे, अध्यक्ष, चंद्रपूर जि. म. सह. बॅंक, डॉ. प्रकाश महाकाळकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, भद्रावती हे राहणार आहेत.
या जिल्हा साहित्य संमेलनातील भरगच्च साहित्यिक कार्यक्रमात सर्व साहित्य प्रेमी, मराठी भाषा प्रेमी, साहित्यिक, कवी, समीक्षक, अभ्यासक, वाचक, रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन वि. सा. संघ शाखा भद्रावतीचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. सुधीर मोते, उपाध्यक्ष, प्रवीण आडेकर, सचिव, डॉ ज्ञानेश हटवार सहसचिव, अनिल पिट्टलवार, शालिक दानव व वि.सा. संघ पदाधिकाऱ्यांनी, तसेच झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".