नागपुर (वि.प्र.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याद्वारे आयोजित युवा महोत्सव 2025-26 मध्ये Science of Innovation या विज्ञान प्रदर्शनीत नागपूर जिल्हयातून प्रथम पुरस्कार ज्योतिबा ज्युनिअर कॉलेज नविन नंदनवन, नागपूरच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला.
लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. चतुर्वेदी साहेब, व सचिवा सौ. आभाताई चतुर्वेदी मॅडम तसेच प्राचार्या सौ. अरूणा जी. कडू, पर्यवेक्षक श्री. जे. बी. वांढे, श्री. एस. डी. चोपडे, विभाग प्रमुख सौ. कांदबरी राऊत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राज्य पातळीवर त्यांची निवड झाली आहे
