अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नियुक्त्या जाहीर .. जिल्हा संपर्कप्रमुख माजी सैनिक ड्रेफुल आत्राम, महानगर अध्यक्ष किशोर शेडमाके तर जिल्हा शहर युवा अध्यक्षपदी प्रशांत लोमेश उईके यांची निवड .!
चंद्रपूर (वि.प्र.) : देशपातळीवरील 1966 -1967 मध्ये केंद्र शासनाची मान्यता प्राप्त असलेली आदिवासींची एकमेव सामाजिक संघटना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा चंद्रपूरच्या विविध नियुक्त्या जाहिर झाल्या असून जिल्हा संपर्कप्रमुख माजी सैनिक ड्रेफुल आत्राम यांची नियुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम यांनी त्यांना नियुक्त पत्र सोपवुन केली आहे. सोबतच चंद्रपूर शहर महानगर अध्यक्षपदी किशोर शेडमाके यांची तर चंद्रपूर जिल्हा युवा शहराध्यक्षपदी प्रशांत लोमेश उईके यांची निवड करण्यात आली असुन, सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना राष्ट्रीय पातळीवर असलेल्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली संघटनेचे काम जोमाने सुरूवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.सर्वांनी एक दिलाने या संघटनेचे काम करून जिल्ह्यात नंबर एकची संघटना करण्याचे आश्वासन देवुन जिल्हा व तालुका स्तरावर नव्याने संघटन बांधणीचे काम करतानाच सुशिक्षित बेरोजगार, युवक, विद्यार्थी यांच्या समस्येसह शेतकरी- शेतमजूरांच्या समस्या सोडवण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे ठरविण्यात आले .आदिवासीच्या बिंदू नामावली तसेच नोकर भरती संबंधात पावले उचलण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने ठरविण्यात आले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, जिल्हा कार्याध्यक्ष आनंद तिराणकर, सर्व सचिव रवींद्र मेश्राम, जिल्हा अध्यक्षा बेबीताई उईके आदी मान्यवरांनी याप्रसंगी नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन केले.
