महामानवांचा जयंती महोत्सव आणि सत्कार सोहळा संपन्न .!

बल्लारपुर (का.प्र.) : श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर-बामणी द्वारा आयोजित महामानवांचा जयंती महोत्सव आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आणि गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिवसभर भजन संमेलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री पी. यू. जरीले यांनी भुषविले. सत्कारमूर्ती मा.करिश्मा मोरे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन, बल्लारपूर, प्रा. अर्चना लिंगे नेट परिक्षा उत्तीर्ण यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते मा. विनायकराव साळवे आणि मा. मनोहर माडेकर होते. सत्कारमूर्ती यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. साळवे यांनी पंढरपूर वारीतील जीवनमूल्ये यावर प्रकाश टाकला. माडेकर यांनी संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि गाडगे महाराज यांचे जीवन आणि कार्य आणि आज आपल्याला त्या विचारांवर चालण्याची का आवश्यकता आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. 
    कार्यक्रमात २६ भजन मंडळांनी सहभाग घेतला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे स्वागतगीत श्री दिलीप दातारकर, श्रीमती पुजा महल्ले आणि श्रीमती सुवर्णा कष्टी यांनी सादर केले. जीजाऊ वंदना श्रीमती सुवर्णा कष्टी आणि कु. आचल काकडे यांनी अत्यंत गोड आवाजात गायली.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्रा. राजेंद्र खाडे यांनी केले. सुत्रसंचालन श्री नितीन वरारकर ,श्री बालाजी भोंगळे आणि आभार प्रदर्शन श्री अतुल बांदुरकर यांनी केले. 
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एम. यु.बोंडे, सहसचिव श्रीमती कमलताई वडस्कर, संचालक प्रा.युगराज बोबडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती वंदना पोटे, उपाध्यक्षा श्रीमती किरण बोबडे, युवा आघाडीचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे, व्यवस्थापक सुमित कौरासे, बालाजी भोंगळे, शंकर पुलगमवार, मंडळाचे कार्यकारिणी सदस्य,आजिवन सदस्य, युवा आघाडीचे सदस्य, महिला आघाडीच्या सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".