बेस्ट प्रेस रिपोर्टर अवार्ड ने कु.माधुरी कटकोजवार यांचा गौरव .!

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते चंद्रपूरात आईसाहेब बहुउद्देशीय संस्थेच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन संपन्न .! 

चंद्रपूर (वि.प्र.) : महानगरातील प्रियदर्शिनी सभागृहात दि.२१मार्च २०२६ ला सायंकाळी ७ वाजता पासुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते गोरगरीब जनतेसाठी कार्यरत असणाऱ्या आईसाहेब बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. याअंतर्गत रामदास आठवले हे तिसऱ्यांदा राज्यसभेवर निर्वाचित झाल्याबद्दल त्यांचा भव्यदिव्य सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. तत्पूर्वी नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण, शालेय सुमारे १०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, दिव्यांग व्यक्तींना तिनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात विषेश कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना मंत्रीमहोदय नामदार आठवलेंच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शहरातील उच्चशिक्षित युवा महिला पत्रकार कु.माधुरी कटकोजवार (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन, एम.ए.हिंदी गोल्ड मेड्यालिस्ट) यांना "बेस्ट प्रेस रिपोर्टर अवार्ड" देवून नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.पी.आय.(आठवले) चे अशोक घोटेकर (विदर्भ सचिव) तर गौतम तोडे (जिल्हाध्यक्ष) तसेच आर.पी.आय.(आंबेडकर) जिल्हाध्यक्षा प्रियाताई खाडे आदिंची मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. आयोजक व संस्थाध्यक्ष विक्कीराज वानखडे , अरुण घोटेकर, प्रियाताई खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री प्रभाकर खाडे, डॉ आकाश जिवने, सुनिल रामटेके, योगेश तात्पुरते, ज्ञानेश्वर नगराळे, विवेक खाडे, संघर्ष उपरे, आशिष ताजने आदींनी विषेश परीश्रम घेतलें.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".