चंद्रपुर (वि.प्र.) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब_आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आज दि.१४ एप्रिल ला शहरातील मुख्य मार्गावरील महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. भिमरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर निनादुन गेला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. हिराचंद बोरकुटे, आदिवासी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, ओबीसी सेल शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष बब्बूभाई ईसा, विद्यार्थी सेल शहर जिल्हाध्यक्ष परब गिरडकर, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष दीपक कटकोजवार, शहर सरचिटणीस आनंद तिरानकर, शहर सरचिटणीस अरविंद माहूरपवार , शहर सचिव अरविंद परचाके, अनुप बेले ,शहर सचिव महेंद्र शेरकी, नंदा शेरकी , शोभा घरडे ,सरस्वती गावंडे , लता जांभुळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.
रा. काँ. द्वारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ..!
byChandikaexpress
-
0
