जनगणना कार्य एक आव्हान .!

नागपूर (वि.प्र.) : भारत सरकार द्वारे संपूर्ण भरतात जनगणना प्रारंभ झाली आहे जी तीन टप्प्यात घेण्यात येत आहे. प्रथमतः घर यादी तयार करणे द्वितीय घर गणना करणे तृतीय लोकसंख्या गणना आता 16 मे पासून प्रथम आणि द्वितीय चरण प्रारंभ झाले आहे.जे 14 जून पर्यंत चालणार आहे.जिल्हाधिकारी यांनी ही जबाबदारी महनगर पालिका यांच्या नेतृत्वात पूर्ण करण्या साठी दिली आहे. म्हणून प्रत्येक झोन सह उपायुक्त यांनी आपल्या झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व खाजगी अनुदानित संस्थेतील शिक्षकांची नियुक्ती प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून केली आहे. हा काळ शाळेच्या व शिक्षकांच्या भवितव्याचा असतो कारण याच काळात शाळेत विद्यार्थी प्रवेश घेत असतात असे असतांनी शिक्षक राष्ट्रहित करीता 12/12 तास काम करीत आहे सकाळी व संध्याकाळी जनगणना तर दुपारी शाळेतील प्रवेशाचे काम करीत आहे. डोक्यावर 46 डिग्री तापमान नाचत आहे तर दुव्हेरी कामाचा ताण आणि त्यात ही जनगणनेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाला लोकांचे असमाधानी सहकार्य ही सर्व युद्ध परिस्थिती शेवटी शिक्षकांच्या नशीबच परंतु भारताचे जागरूक व क्रियाशील सर्व शिक्षक मानधन लक्षात न ठेवता फक्त न फक्त देशाच्या हिता करीता सर्व वाईट परिस्थिती बाजूला ठेवून कार्य करीत आहेत. म्हणून महानगर पालिका कर्मचारी सोबत समन्वय साधून शिक्षक हा आव्हान स्वीकार करीत आहे.याचे सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".