संविधान उद्देशिका वाटप .!

संविधान उद्देशिका वाटप तसेच मतदार यादी विशेष गहन पुनर्निरीक्षण शिबीराचे आयोजन…!

बल्लारपूर (का.प्र.) : बल्लारपुर प्रभाग क्र. १० मध्ये नगरसेवक सुमित (गोलू) डोहणे तथा नगरसेविका साजिया शाहिद शेख यांच्या सौजन्याने भव्य संविधान उद्देशिका वाटप तसेच मतदार यादी विशेष गहन पुनर्निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास नगर परिषद बल्लारपुर नगराध्यक्षा डॉ. अलका अनिल वाढई मॅडम, नगर परिषद उपाध्यक्ष मा. देवेंद्र (पापा भैया)आर्य, तहसीलदार मा. रेणुका कोकाटे मॅडम, डॉ. अनिल वाढई साहेब, इंजि. राकेश सोमाणीजी तसेच सर्व प्रभागातील बीएलओ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नागरिकांना संविधान उद्देशिकेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला.प्रभाग क्रमांक १० मध्ये नगरसेवक सुमित उर्फ गोलू डोहणे तथा नगरसेविका साजिया शाहिद शेख यांच्या सौजन्याने भव्य संविधान उद्देशिका वाटप तसेच मतदार यादी विशेष गहन पुनर्निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमास नगर परिषद बल्लारपुर नगराध्यक्ष मा. अलका अनिल वढाई मॅडम, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य भैय्या, तहसीलदार रेणुका कोकाटे मॅडम, डॉ. अनिल वढाई सर, इंजि. राकेश सोमाणी जी उपस्थित होते. तसेच सर्व प्रभागातील बीएलओ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नागरिकांना संविधान उद्देशिकेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. प्रभागातील आनंद रामटेके,प्रा.कांबळे सर, अनिल सुखदेवे, विनोद वाळके, संजय शेलकर, अशोक कांबळे, हेमंत मानकर, शेख करीम भाई,आनंद मेश्राम जयंत दुर्गे, भारत बोम्मावार,फारुख भाई यांना संविधान उद्देशिका वाटप करण्यात आले तसेच मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी शाहिद शेख, रितेश अलोने, लालू शेंडे, रोशन बोम्मावार, शुभम लभाने, गौरव नाडमवार, परीस महाजनवार, संस्कार सुखदेवे, यश देवगडे, आरिफ खान, नंदू पाल, रिक्की कैथवास, लड्डू निमगडे, पवन तोकलवार, गौरव मेश्राम मनीष सिडाम, तरुण देवराव, अक्षय रिंगणे, इर्शाद भाई उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".