बल्लारपूर (का.प्र) : कवि कुसुमग्राज यांच्या जन्मदिन निमित्य मराठी भाषा गौरव दिन, दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ ला क्रेसेंट पब्लिक स्कूल बल्लारपूर, येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या परिपाठणे करण्यात आली. या परिपाठत कु. मोहिनी वानखेडे, कु. ओजस्वी रामटेके, कु. उन्नती नथानि, कबीर ठाकुर व अनुस्वी रामटेके तसेच कु. सुमित निषाद यांनी सहभाग घेतला होता.
परिपाठची सुरुवात सर्वप्रथम प्रार्थनेने करण्यात आली त्यानंतर मराठी भाषेत प्रतिज्ञा घेण्यात आली आणि राष्ट्रगीत म्हणण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. सुवर्णा रामटेके यांनी केले. मराठी दिवसाचे महत्व आणि मराठी भाषेचे अस्तित्व पटवून देण्यासाठी समय्यक गोंडाने, प्रणव दूधलकर, श्रीनिधी निरवटला व हिमणी खांडले या विद्यार्थिनीं आपल्या भाषनाद्वारे मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व पटवून दिले. मराठी औचित्य साधून कवि कुसुमग्राज यांच्याप्रमाणे मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कवि किशोर बळी यांची प्रभात ही कविता युक्ता नथानी, मोहिनी वानखेडे, आर्याण नथानी, अदिना शेख, रेहत कलसी, रीतिका झा या विद्यार्थ्यांनी सादर केली.
त्यानंतर मराठी दिनाच्या कार्यक्रमाची सांगता ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यागीतावर फरान शेख, लावण्या भैसारे, यक्षिता प्रजापती, तसेच आवेज शेख व नैमत शेख यांच्या द्वारे करण्यात आली. मराठी भाषेवरील आपले विचार चित्राद्वारे व्यक्त करण्यासाठी हुमेरा शेख, क्रिश दालवनकर, परिनाज शेख हर्षल वनकर, शालिन मोहरे, आर्शिया गिडवाणी यांच्या द्वारे पोस्टर तयार करण्यात आले. कार्यक्रमच्या शेवटी शाळेची प्रधाणाचार्या श्रीमती. हुमेरा खान यांनी मराठी व महाराष्ट्र बद्दल आपले विचार व्यक्त केले तसेच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिले. कार्यक्रमात क्रेसेंट शिक्षण प्रसारक मंडलचे शिक्षकवृंद उपस्थित होते. श्रीमती सुवर्णा जगझाप नी आभार प्रदर्शन प्रस्तुत करून कार्यक्रमाच्या समारोपाची घोषणा केली.
अशाप्रकारे मराठी दिवस क्रेसेंट पब्लिक स्कूल येथे मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुवर्णा रामटेके यांनी केले.