बल्लारपुर (का.प्र.) : श्री.गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त अमृततीर्थ विहीर संस्थान आकोली-आकोलखेड, (पोपटखेड रोड) येथे सुरू असलेल्या कथा सप्ताहाच्या समाप्ती चे दिवशी संस्थान चे अध्यक्ष श्री नारायणराव इंगळे,उपाध्यक्ष श्री. ओंकारराव टोलमारे,श्री.अजयदादा ठाकरे,श्री.केशवराव बोडखे व विश्वस्त यांनी से.नि.DFOपारडीकर साहेब यांचे उपस्थितीत सतत तीस वर्षे महसूल विभागात प्रामाणिकपणे ड्युटी सांभाळून समाजसेवा केली व सेवा निवृत्त झाल्यावर ही नॅचरोपॅथी डॉक्टर ची पदविका संपादन करून समाजसेवा करत आहेत म्हणून डॉ. रतनलाल तायडे भोई ग्रामपंचायत सदस्य तथा निर्माता भोईराज कॅलेंडर यांचा शाल व श्रीफळ देऊन कथा वाचक श्री समाधान महाराज शर्मा यांच्या कथेच्या सातव्या दिवशी कथा समाप्ती चे पावन पर्वावर संस्थान चे कार्यालयात सत्कार केला.