चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न.!

बल्लारपुर (का.प्र.) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.४/३/२०२४ रोजी गोपाला पैलेस बल्लारपूर शहरात हजारो युवकांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. सदर जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजी. राकेश सोमानी यांनी केले होते.
सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अश्वारूढ पुतळ्यांना माल्यार्पण केल्यानंतर युवकांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सभागृहात ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यारपण करीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर आयोजकांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांचे पुष्पगुच्छ, शॉल व श्रीफळ देऊन देत सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण, विदर्भ अध्यक्ष निखिल दादा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, प्रदेश सरचिटणीस आबिद अली, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झांबरे, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष अर्चनाताई बुटले, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जाहीर खान, अल्पसंखाक सेलचे प्रदेश सचिव कुतुबुद्दीन सिटी, चंद्रपूर शहराध्यक्ष अभिनव देशपांडे, बल्लारपूर तालुकाध्यक्ष महादेव देवतळे, माजी अल्पसंख्यांक अध्यक्ष महमूद मुसा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, सामाजिक कार्यकर्ता सुमित (गोलु) डोहने, जिल्हा सचिव सरफ़राज शेख ह्यांची उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एकूण जिल्ह्यातील संघटनेबाबत माहिती देत तालुका स्तरावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशच्या वतीने ताकद द्यावी या संदर्भातील मागणी इंजी. राकेश सोमाणी यांनी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्याकडे केली. तसेच अजितदादा यांच्या विचाराने प्रेरित होणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन तळागाळापर्यंत नेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेनार असल्याची ग्वाही देत येणार्या काळात जिल्हयात युवकांच्या संघटनेत क्रमांक एक चा पक्ष हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच राहणार असा ठाम विश्वास देखील व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आपल्या मनोगतात अत्यंत कमी वेळात फक्त दोन दिवसांच्या अल्पावधीत एवढ्या भव्य युवक मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल इंजी. राकेश सोमानी यांचे कौतुक करीत आज पर्यंत केलेल्या संघटन बांधणीमुळेच हे शक्य झाले असे मत व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन बांधण्यात अथक परिश्रम घेणारे सोमानी यांना येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने योग्य न्याय द्यावा अशी मागणी भटारकर यांनी प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांच्याकडे केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये देखील जास्तीत जास्त युवकांना प्राधान्य देणार असल्याबाबत आजच्या कार्यक्रमात जाहीर केले.
अध्यक्षीय भाषण करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांनी देखील राकेश सोमानी यांच्या संघटन बांधणी बाबत कौतुक करीत संपूर्ण राज्यातील हा पहिला असा जिल्हा आहे जिथे स्वतःहून "आम्हीं कार्यक्रम घेणार आपण वेळ द्यावा" अशी मागणी करण्यात येते व दोन दिवसाच्या काळात एवढ्या भव्य कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल राकेश सोमानी यांचे कौतुक केले. येणाऱ्या काळात अजितदादांच्या माध्यमातून या राज्यातील युवकांना न्याय देत ताकद देणार असल्याचे सांगताना सोबतच चंद्रपूर सारख्या ज्या जिल्ह्यात एकही खासदार नाही, आमदार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुख्य पदावर लोकप्रतिनिधी नाही तरी या जिल्ह्यात युवकांचे उत्कृष्ट संघटन बांधणी केल्याबद्दल भविष्यात पक्षाच्या वतीने जेव्हा केव्हा काही देण्याची वेळ येईल तेव्हा राकेश सोमानी यांच्या बद्दल प्राधान्याने सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच चांदा ते बांधा युवकांची अजित संवाद यात्रा लवकरात लवकर काढण्यात येणार असे जाहीर करत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा अजित दादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो युवकांच्या उपस्थितीत भव्य युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याबाबतची माहिती दिली.
सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष निखिल ठाकरे, चंद्रपूर शहराध्यक्ष राजीव कक्कड यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. 
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सुमित(गोलु) डोहने, प्रशांत झाम्बरे, अंकित निवालकर, सरफ़राज़ शेख़, राजेश केशकर, नीरज तिवारी, आसिफ़ शेख़, प्रदीप टोंगे, राहुल रामटेक, उज्वल मद्दलवार, चिंटू भोगले, संस्कार सुखदेवे, गोलु जयसवाल, प्रनीत सातपुते यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.