श्री वल्ली मराठी व्हर्जन करण्याऱ्या विजय खंडारे यांच्या नविन व-हाडी गीताचे चित्रीकरण अमरावती मध्ये संपन्न!
अमरावती (चं.ए.ब्युरो) - मल्टी टास्क फिल्म प्रोडक्शन अमरावती प्रस्तुत उगीमुगी या आगामी वऱ्हाडी गीताचे चित्रीकरण धानोरा पूर्णा या गावी संपन्न झाले असून या गीताचे दिग्दर्शक व गीतकार सागर भोगे आहे.
सह दिग्दर्शक -आशिष सुंदरकर, कला दिग्दर्शक -सुधीर पेंडसे,छायांकन संकलन - कीर्ती नंदन इंगोले,संगीत -चेतन ठाकूर यांनी दिले असून रंगभूषा -विनय भगत आहेत. श्रीवल्ली मराठी व्हर्जन करण्याऱ्या विजय खंडारे हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तसेच प्रमुख भूमिकेत श्रृतिका गावंडे हे सुध्दा असणार आहेत.तर सह कलाकार -श्रद्धा गजबे, ललिता वानखडे, नितेश कथे, सुधीर पेंडसे,भूषण जोंधळे सुमित तिजारे, मनिष पतंगराय , आशिष सुंदरकर, विशाल वानखडे, , गौरव प्रधान, हे गीत भूषण जोंधळे,अवंतिका मानकर यांनी गायले आहे आणिल वकरच हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.