माजरी सातव्यांदा जलमय पुन्हा जन जिवन विस्कळीत.रहदारी बंद!

भद्रावती (ता.प्र.) - जोरदार मान्सुन चे आगमन झाल्याने सर्वत्र मोठ्या प्रमानात पाउस पडला. सर्व नदी नाले तलाव, धरणं भरलेली आहे.त्यामुळे माजरी गावात सातव्यांदा नदीचे पाणी शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.लगद असलेल्या शिरना नदीच्या पुलावरुन पानी वाहत असल्याने रहदारी काल रात्रो पासुन बंद आहे।पाण्याची पातळी वाढत असल्याने नदी काठच्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पाटाळा वणी जानार्‍या मार्गावर वर्धा नदी पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पाटाळा वणी मार्ग बंद करण्यात आला आहे। मुळात सातव्यांदा माजरी गावात पुराचे पानी शिरले असल्याने लोकांचे हाल होत आहे. एकंदरीत जवळच ओपन कास्ट कोळसा खान असल्याने त्या खानीतील मातीच्या ढिगार्‍याने पानी प्रवाहाला अळथळा निर्माण होत आहे त्यामुळे पुराचे पानी गावात आणी लोकांच्या घरात शिरत आहे असा आरोप गावकर्‍यां मार्फत करण्यात येत आहे. तसेच रहदारीचे सर्व मार्ग बंद असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. शिरना नदी पुल,वर्धा नदी पुल पाटाळा येथे माजरी पोलीस प्रशासना मार्फत सुरक्षा प्रदान करण्याकरीता बंदोबस्त लावण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".