भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती तालुक्यातील पिपरी देश व कोच्ची या गावाचा संपर्क वर्धा नदिला आलेल्या पूरामूळे तुटला आहे . त्यामूळे पिपरी कोच्ची घोनाड या गावातील शेतकर्या नां या वर्षी पांचव्यादा पुराला तोंड देता देता जिव मेटाकुटीस आला आहे . आज पर्यंत शेतकर्यांना शासनाची कुठलीही मदत मिळाली नसताना सत त पेरण्या करून पिक गमवावे लागत आहे. तूर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी तसेच मीरची वांगी लागवड करून सुध्धा शेतकर्या च्या हातात काहीच आले नाही तोच पुराने सर्व भुई सपाट केले असे या वर्षी पाच वेळ झाले . शेतकर्या वर यावर्षी बॅकेचे कर्ज, खासगी सावकारी कर्ज काढून शेती वर खर्च करून डोळ्यासमोर काहीच दिसत नसल्यामूळे शेतकऱ्यांची हिम्मत खचली आहे यावर्षी चे कृषी कर्ज सपूर्ण माफ करावे अशी एकमुखी मागणी शासनाकडे शेतकऱ्यांनी केली आहे . तसचे वे को ली च्य मातीच्या ढीगार्या मूळे सतत पूरयेत आहे . त्यामूळे वेकोलीने सुद्धा या गावाला मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे . शेतक-याचे पीक नसल्यामूळे शेतमजूर सुद्धा संकटात सापडले आहे सनासूदी च्या दिवसात सुध्दा मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे . त्या साठी शासनाने काम दयावे अशी आर्त हाक शेत मजूरा करन देण्यात येत आहे .
पिपरी (देशमुख) कोच्ची गावाचा संपर्क पूरामूळे तुटला!
byChandikaexpress
-
0
