पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी घेतली वनमंत्री यांची सदिच्छा भेट!



राहीबाई यांनी जैविक शेतीला एका वेगळया स्तरावर पोहोचविले .. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार 

बल्लारपुर (का.प्र.) - देशभरात बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सहयाद्री अतिथीगृह येथे आज सदिच्छा भेट घेतली. राहीबाई यांनी केलेले काम निश्चित कौतुकास्पद असून त्यांनी जैविक शेतीला एका वेगळया स्तरावर पोहोचविले असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.गेल्या दोन दशकांहून अधिक काळ श्रीमती. पोपरे या गावरान वाण जपत त्याच्या बिया संकलित करण्याचे काम करत आहे. स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून देशी पिके पिकविणाऱ्या पोपरे यांनी अनेक शेतकऱ्यांना एकत्र करून जैविक शेतीला चालना दिली आहे.या सदिच्छा भेटीवेळी ममताबाई भांमरे, योगेश नवले आणि डॉ. राजश्री जोशी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".