विवेकानंद वार्ड, झासी राणी चौकात सी.सी.टी.व्ही. कैमेरे लावण्याची मागणी अद्यापही अपुर्ण - रोहन कळसकर (सामाजिक कार्यकर्ते)
बल्लारपुर (का.प्र.) - संपूर्ण बल्लारपूर शहरात महाराष्ट्र शासना च्या माध्यमातून सी.सी.टि.व्ही.कैमेरे लावण्यात आले होते. मात्र स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे अनेक सी.सी.टि.व्ही. कैमेरे खराब झाली तर काही चोरी गेले. स्थानिक प्रशासना कडुन मेनटनेंस न झाल्याने शहरातील अनेक सी.सी.टि.व्ही. कैमेरे लुप्त झालीत तर अनेक वर्षा पासून बल्लारपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सुवर्ण महाराष्ट्र चे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी तर बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस मित्र रोहन कळसकर हे झासी राणी चौक येथे सी.सी.टि.व्ही. कैमेरे लावण्यासाठी वारंवार मागणी करत आहेत.त्यांनी महाराष्ट्र वन मंत्री मा.सुधिरभाऊ मुनगंटीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री हंसराज अहिर यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे. मात्र आता पर्यंत कुठल्याही प्रकारे यावर तोडगा निघाला नाही आणि सी.सी.टि.व्ही. कैमेरे सुध्दा लागलेले नाही.या बाबत प्रभाग क्रमांक 03 च्या व्हाट्सऍप गृप वर कळसकर यांनी आपली भावना व्यक्त केली अस्ता प्रभागाचे माजी नगरसेवक वाघमारे यांनी कळसकर यांना उध्दटपणाने रिप्लाय दिले आहे. विषेश म्हणजे कळसकर यांच्या मेसेज मध्ये कुणाच्या ही नावाचे उल्लेख नसंताना माजी नगरसेवक अरुण वाघमारे यांनी दिलेल्या उध्दट रिप्लाय मुळे माजी नगरसेवक यांना असे बोलने अशोभनीय आहे आणि नगरसेवक जर असे बोलत असणार तर आम जनता जाणार तरी कुणा कडे अशी भावना सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सुवर्ण महाराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी रोहन कळसकर यांनी व्यक्त केली आहे.वार्डवासी गेल्या पाच वर्षां पासून तर आतापर्यंत अनेक वेळा नगरसेवक ते माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या पर्यंत विवेकानंद वार्ड झासी राणी चौक येथे सी.सी.टि.व्ही.कैमेरे बसविण्या साठी वांरवार निवेदन सादर केले आहे. परंतु या वर आतापर्यंत कुणाचेही लक्ष दिसुन येत नाही आहे. याचे नेमके मुख्य कारण काय?
