निषाद पार्टि चे वतीने कन्हान या ठिकाणी सभेचे आयोजन..!

नागपुर (प्रा.राहुल जी.गौर) - निषाद पार्टि चे वतीने कन्हान या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला मच्छिमार बांधवांनी भर पावसात प्रचंड प्रमाणात उपस्थित दर्शविली. समाज बांधवांनी निषाद पार्टिला तन मन धनाने मदत करण्याचे आश्वासन दिले. आजपर्यंत अनेक राजकारणी लोकांनी आम्हाला खोटे आश्वासन देऊन आमचे मत घेतात व स्व:त मोठे होतात. जनतेच्या समस्या जसे होते तसेच आहेत.निषाद पार्टि चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास केवदे यांनी जनतेला संघटित होऊन निषाद पार्टी चे हात मजबुत करण्यासाठी प्रयत्न सुरू करा असे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक समाजबांधवांनी सहकार्य केले. विदर्भ अध्यक्ष विजय साटोटे, सुग्रीव सहाणी ,राहुल गौर, जयंत मेश्राम,मनोज बावने भारत मोहनकर,बाबु कश्यप, संतोष कश्यप, बालचंद्र बोंद्रे, अंबादास भोयर, राजकुमार बावने, विजय सोनवाने,संचालन मनोज बावने यांनी केले तर आभार राहुल गौर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".