धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रबोधन मेळावा..!

भद्रावती (ता. प्र.) - धनगर जमात मंडळ चंद्रपूर आणि धनगर अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जमातीतील मुलामुलींना प्रोत्साहन मिळावे यासाठी आय एम ए सभागृह चंद्रपूर (एस पी कॉलेज जवळ, गंज वॉर्ड) येथे जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि प्रबोधन मेळावा दिनांक १८ सप्टेंबर २०२२ ला रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मंगेश गुलवाडे राहणार असून उद्घाटन डॉ. अर्चना मस्के (यवतमाल) करणार आहे. वेकोली नेते सुधीरभाऊ घुरडे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून प्रमुख मार्गदर्शन अनिलकुमार ढोले (नागपूर) करणार आहे. साईनाथजी बुचे, इंजि. उपासे साहेब, संतोष जिल्लावार, डॉ. तुषार मार्लावार, विजय कोरेवार, महेश देवकते, योगिराज उगे, अजयजी मेकलवार प्रामुख्याने उपस्थित रहाणार आहे. तरी मार्च २०२२ च्य्या परीक्षेत दहावी ८५ टक्के पेक्षा जास्त मार्क्स आणि बारावी ८० पेक्षा जास्त मार्क्स असलेले गुणवंत विद्यार्थी तसेच शैक्षणिक , सामाजिक , क्रीडा , सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले यांनी आपली गुणपत्रिका / प्रमाणपत्र धनगर जमात मंडळ चंद्रपूर यांच्या कडे द्यावी. सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आव्हाहन डॉ . यशवंत कन्नमवार, कैलास उराडे , हेमंत ढोले, सुनील पोराटे, गजाननराव शेळके, डॉ. धर्माजी गावंडे, महादेवराव गराड, शिरीष उगे, पवन ढवळे, प्रविण गिलबिले, विठल गोंडे, निलेश काळे, रामकुमार अकापल्लिवार, धनंजय डवरे, संदीप शेरकी, प्रविण बुचे, प्रशांत घोरूडे, पुरुषोत्तम येडे, गणेश चिडे, संतोष निकुंभे, सुनील इखारे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".