विद्यार्थी व्यक्तित्व विकास कार्यक्रमाचे आयोजन..!

निळकंठराव शिंदे महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तित्व विकास कार्यक्रमाचे आयोजन..!

भद्रावती (ता. प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात प्लेसमेंट सेल व एम्प्लॉयमेंट गायडन्स करिअर अँड कौन्सिलिंग सेल विभागातर्फे विद्यार्थी व्यक्तित्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था,भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे,प्रमुख वक्ते डॉ पराग धनकर,राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर , प्रमुख पाहुणे भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती चे सचिव प्राध्यापक डॉ कार्तिक शिंदे तसेच कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके उपस्थित होते.सर्वप्रथम सर्व पाहुण्यांनी स्वर्गीय निळकंठराव शिंदे यांच्या प्रतिमेला मल्याअर्पण केले.कार्यक्रमाची सुरुवात सर्व उपस्थित पाहुण्यांच्या स्वागताने झाली.सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांनी आपल्यातील प्रतिभा ओळखावी व क्लासरूम शिक्षणाच्या पूर्ण बाहेरील विश्व काय आहे असा कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.याप्रसंगी प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ पराग धनकर यांच्या सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्राध्यापक डॉ पराग धनकर, सहयोगी प्राध्यापक,राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना समस्या प्रती काही कर्तव्य आहे ते स्पष्ट केले वेळेवर असलेल्या उपलब्ध संधीचा विद्यार्थिनींनी शिक्षणात घ्यावयाचा फायदा विद्यार्थ्यांनी आमच्या यशस्वी होण्यासाठी नकारात्मकता बाहेर काढावी विद्यार्थ्यांनी आनंदात जीवन जगण्याची सवय करून घ्यावी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमात भाग घेऊन नाविन्यपूर्ण गोष्टी आत्मसात करून आपल्या आत्मविश्वास वाढवावा असे मोलाचे मार्गदर्शन स्लाईट शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था,भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना यश प्राप्त करण्यासाठी आऊट ऑफ बॉक्स जाऊन यश संपादन करणे व जाणीवतात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली सांगितली.या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ नरेंद्र हरणे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ एन एस वाढवे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक कुलदीप भोंगळे, प्राध्यापक सचिन श्रीरामे,प्राध्यापक डॉ कादरी,प्राध्यापक डॉ वाढवे, प्राध्यापक डॉ दहेगावकर प्राध्यापक डॉ बेदरे,प्राध्यापक प्रधान, प्राध्यापक डॉ हजारे,प्राध्यापक डॉ शित्रे,प्राध्यापक डॉ नासरे,श्री मानकर,श्री आखातकर यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला डॉक्टर विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".