भद्रावती (ता.प्र.) - विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती च्या वतीने ग्रंथ लोकार्पण सोहळा व निमंत्रितांचे विदर्भस्तरीय कवी संमेलन दिनांक 16 ऑक्टोबर 2022 ला लोकमान्य विद्यालय भद्रावती च्या सभागृहात आयोजित केलेले आहे. विदर्भ साहित्य संघ शतकपूर्ती वर्षा निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे . विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त , झाडीबोली साहित्य मंडळाचे आधारस्तंभ ,जेष्ठ साहित्यीक आचार्य ना.गो .थुटे यांच्या आत्मचरित्राचा लोकार्पण सोहळा , कर्तुत्ववंतांचा सत्कार व विदर्भस्तरीय निमंत्रित कवींचे कविसंमेलन दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोज रविवार ला लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे.
या साहित्यीक कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ राम बोडेवार ,ज्येष्ठ साहित्यिक नागपूर , ग्रंथ भाष्यकार म्हणून डॉ. रविद्रनाथ केवट , डॉ श्याम मोहरकर जेष्ठ साहित्यीक चंद्रपूर , कवी संमेलनाचे अध्यक्ष किशोर मुगल सुप्रसिद्ध कवी व गझलकार, डॉ विजय सोरते आदी मान्यवरयांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती च्या वतीने आयोजित कविसंमेलनात विदर्भातील रामटेक ,नागपूर ,वर्धा, हिंगणघाट, गडचिरोली ,चंद्रपूर अशा विविध भागातील निवडक 27 निमंत्रित कवी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा या साहित्यिक कार्यक्रमाचा व कवी संमेलनाचा परिसरातील साहित्यिक , रसिक, श्रोत्यांनी आस्वाद घ्यावा व या साहित्यीक चळवळीत मोठ्या संख्येत उपस्थित राहवे असे आवाहन अध्यक्ष डॉ. सुधीर मोते व सचिव डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले आहे.
