आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत शिंदे महाविद्यालयाला 2 सुवर्ण व 1 रजत पदक.!

भद्रावती (ता.प्र.) - राजीव गांधी महाविद्यालय, चंद्रपुर येथे १० ते ११ नोव्हेंबर २०२२ रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आंतर महाविद्यालय वेटलिफ्टिंग, पाँवरलिफ्टिंग व बॉडीबिल्डींग स्पर्धा आयोजन करण्यात आली.राजुरा येथे आयोजित विविध स्पर्धेत निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथील कु.भाग्यश्री विनायक खिराळे बी.एस्सी. (द्वितीय वर्ष), पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ८३ किलो वजन गटात विजयी होवून सुवर्ण पदक प्राप्त केले.वैशाली रामेश्वर दाते एम.एस्सी (प्रथम वर्ष) ६३ किलो वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केले. विशेष बाब म्हणजे सदर खेळाडूला सत्र २०२२-२०२३ गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली स्ट्रॉंग वूमन म्हणून गौरविण्यात आले. प्रज्वल धोंडीबा पवार बी.एस्सी. (प्रथम वर्ष),या विद्यार्थ्यांने ६६ वजन गटात रजत पदक प्राप्त केले. या यशाचे श्रेय खेळाडूंनी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. विशाल शिंदे व मार्गदर्शन अजिज शेख, साजिद शेख व अमोल आवळे यांना दिले.
गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली आंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेत सुवर्ण व रजत पदक प्राप्त करून नावलौकिक केलेल्या खेळाडूंचा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती तर्फे सत्कार करण्यात आला. भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे, संस्थेचे सहसचिव डॉ. विशाल शिंदे, संस्थेचे सदस्य प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रा. रमेश चव्हाण, प्रा. नरेंद्र हरणे, प्रा. कुंदन सहारे, प्रा. दहेगावकर, प्रा.डॉ. गजेंद्र बेद्रे, डॉ. शशिकांत शित्रे, डॉ.नासरे, प्रा.प्रधान, श्री.अजिज शेख श्री.अजय आसुटकर, श्री.विशाल गौरकार, श्री.किशोर जथाडे, श्री.शरद भावरकर, श्री. पांडुरंग आखतकर, श्री. खुशाल मानकर, श्री. प्रमोद तेलंग सत्कार कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. खेळाडूंना गौरविण्यात आले व पुढील होणार्‍या आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता सुभेच्छा देण्यात आल्यात.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".