शिंदे कनिष्ठ महाविद्यालय तालुक्यात अव्वल.!

भद्रावती (ता.प्र.) - तालुका क्रीडा संकुल भद्रावती येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन सुरू आहे या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या तालुका स्तरीय  विविध क्रिडा स्पर्धेत 19 वर्षाखालील  वयोगटातील विद्यार्थी , विद्यार्थिनींनी यांनी तालुका स्तरावर विजय संपादन केला. तालुका क्रिडा संकुल येथे झालेल्या कबड्डी व  बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.भद्रावती तालुक्यात अव्वल स्थान प्राप्त करून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला. 19 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी टीमने झालेल्या अटीतटीच्या सामन्यात जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती तसेच फेरी ल्यांड स्कूल भद्रावतीवर विजय प्राप्त करून मुलींनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे .
19 वर्षे वयोगटाखालील झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत मुलींनी  लोकमान्य विद्यालयाच्या टीमचा दारुण पराभव करत विजय प्राप्त केला.  तर 19 वर्षाखालील मुलांनी बॅडमिंटन स्पर्धेत लोकमान्य विद्यालय  भद्रावतीच्या टीमचा दारुण पराभव करून जिल्हास्तरावर प्रवेश निश्चित केला.
विविध क्रिडा प्रकारात विजय खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव   प्रा.  डॉ.  कार्तिक शिंदे , तसेच सहसचिव   प्रा.  डॉ. विशाल शिंदे , प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण    डॉ. ज्ञानेश हटवार   डॉ. सुधीर मोते   माधव केंद्रे, किशोर ढोक, चंद्रशेखर जुमळे,समस्त प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".