भद्रावती (ता. प्र.) - चंद्रपूर जिल्हा शिक्षक भारती पदाधिकारी तथा तालुका अध्यक्ष, कार्यवाह यांची सभा नुकतीच शिक्षक भारती जिल्हा कार्यालय रामनगर चंद्रपूर येथे संपन्न झाली. शासन मान्य शिक्षक भारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार मा. राजेंद्रजी झाडे याच्या अध्यक्षतेत ही सभा पार पडली .
शासन मान्य शिक्षक भारती संघटनेची चंद्रपूर जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची सहवविचार सभा आयोजित करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिक्षक भारती चे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर, विभागीय कार्यवाह सपन नेहरोत्रा, नागपूर अध्यक्ष गभणे सर, भाष्कर बावणकर जिल्हाध्यक्ष, डॉ. ज्ञानेश हटवार जिल्हाध्यक्ष उच्च माध्यमीक, बंजरंग जेणेकर जिल्हाध्यक्ष आदिवासी आश्रम शाळा विभाग व्यासपिठावर विराजमान होते .
यामध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या अधिकार क्षेत्रातील संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कार्यशैली बदल विस्तृत विचारविनीमय केले. चंद्रपूर जिल्हातील नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देवून अभिनंदन करण्यात आले . जिल्हयातील शाळातील शिक्षक मतदार नोंदणी संदर्भात आढावा घेण्यात आला . संपूर्ण जिल्हातील कार्यकत्यांनी आत्मविश्वासात्मक शिक्षक भारतीचा विजयी होणार याविषयी आपले मनोगत व्यक्त केले .
मा.राजेंद्र झाडे यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रभावीपणे येणाऱ्या निवडणूकीत शिक्षक भारतीलाच १ नंबरचे मतदान मिळवून, शिक्षक भारतीचेच उमेदवार विजयी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे मार्गदर्शन केले .
सभेला शिक्षक भारतीचे चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, ब्रम्हपूरी, मुल, सावली, बल्लारशहा, कोरपना, गोडपिंपरी, पोर्भुणां ' येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सर्वांनी आपआपल्या तालूक्यातील शिक्षकांच्या समस्यांवर स्वमत व्यक्त केले .
ही सभा यशस्वी करण्यआसआठी किशोर दहेकर चंद्रपूर शहर अध्यक्ष, पुरुषोतम टोंगे जिल्हा कार्याध्यक्ष, राकेश पायताडे जिल्हा कार्यवाह, यांनी परीश्रम घेतले.
