ना.सुधीर मुनगंटीवार यांना शिंदे यांचे निवेदन..!

 

माननीय सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टी - धनंजय रामकृष्ण शिंदे, राज्य सचिव यांचे निवेदन..!
वन विभागाच्या ACF आणि RFO ची १००% रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत ..!
मुंबई (जगदीश काशिकर) - महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतल्या वन विभागाच्या ACF आणि RFO पदांच्या परीक्षांचा अभ्यास करणारे हजारो परीक्षार्थी आहेत. वन विभागाने २०२२ या वर्षाकरिता MPSC कडे फक्त १३ पदांचे मागणीपत्रक पाठवले आहे. २०२३ पासून महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल प्रस्तावित बदलानुसार वन विभागाच्या ACF आणि RFO या पदांच्या परीक्षांचा सुद्धा समावेश केला आहे. २०२२ पर्यंत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होत असणाऱ्री वन सेवा मुख्य परीक्षा  आता पूर्णतः वर्णनात्मक पद्धतीची झाली आहे. गेल्या ४ वर्षांपासून हजारो विद्यार्थी वनसेवेच्या परीक्षांचा जुन्या पद्धतीप्रमाणे अभ्यास करत आहेत. मे २०१९ ते एप्रिल २०२२ या ३ वर्षांच्या कालावधीत वनसेवेची कोणतीही परीक्षा झाली नसल्यामुळे वीण विभागाने २०२२ या साला साठी फक्त १३ जागांचे मागणीपत्रक MPSC कडे पाठवून ४ वर्षे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. 
२०२३ पासूनच्या नवीन परीक्षापद्धती सोबत जुळवून घेण्यासाठी या इच्छुक उमेदवार विद्यार्थ्यांना किमान १२ ते २४ महिने लागू शकतात त्यामुळे २०२२ ची परीक्षा हि अशा विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असू शकते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वन विभागाच्या कामात असंख्य अडचणी आहेत. त्यामुळे MPSC कडे ACF आणि RFO ची १००% रिक्त पदे  भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करून या स्पर्धा परीक्षार्थींना न्याय द्यावा हि नम्र विनंती.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.