देशाचे सरन्यायाधीश मा.श्री. उदय लळीत यांचा विशेष सत्कार.!

देशाचे सरन्यायाधीश मा.श्री. उदय लळीत यांचा विशेष सत्कार सोहळ्याला मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे राजभवनात उपस्थित.!
मुंबई (जगदीश काशिकर) - देशाचे सरन्यायाधीश मा.श्री. उदय लळीत यांचा विशेष सत्कार सोहळा आज राजभवन येथे पार पडला. या सोहळ्याला मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून मा.श्री.उदय लळीत यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. 
सरन्यायाधीश मा.श्री. उदय लळीत यांचा स्वभाव अतिशय मितभाषी असला तरीही त्यांनी कामातून आपले वेगळेपण सिध्द करून दाखवले आहे. आपल्या कार्यकाळात अनेक अवघड आणि क्लिष्ट प्रकरणे निकाली काढण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. 
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाजाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते लोकांना पाहता यावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे वेगाने निकाली निघावीत यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून कोर्टाचे कामकाज सुरू का करू नये असं वक्तव्य त्यांनी केल्याची आठवण देखील मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी करून दिली. 
याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरन्यायाधीश मा.श्री.उदय लळीत यांच्या पत्नी तसेच राजकीय आणि विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्य सरकार हे कायमच न्यायदान प्रक्रिया जलद व्हावी यासाठी सकारात्मक असून उच्च न्यायालयाकडून याबाबत येणाऱ्या मागण्या आम्ही तातडीने मंजूर करतो असेही यासमयी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाला वांद्रे कुर्ला संकुल येथे हवी असलेली जागा देण्यासाठी देखील राज्यातील युती सरकार सकारात्मक असल्याचे यावेळी बोलताना नमूद केले. 

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.